शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार ३३ कोटींचे चुकारे अदा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:05 IST

आतापर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार ३३ कोटी ४७ लाख रुपयांचे चुकारे करण्यात येत आहेत.

अकोला: महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाला एक हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळाले असून, आतापर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ३ हजार ३३ कोटी ४७ लाख रुपयांचे चुकारे करण्यात येत आहेत.महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात ८१ कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत; परंतु पणन महासंघाकडील पैसा संपल्याने शेतकऱ्यांचे ४०० कोटी रुपयांचे चुकारे पणन महासंघाकडे थकले होते. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पणन महासंघाने कापूस खरेदी बंद केली होती. २० एप्रिलनंतर शेतमाल विक्री-खरेदी करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर पणन महासंघाने राज्यात पुन्हा ८१ कापूस खरेदी केंदे्र सुरू केली असून, या काळात ९ लाख क्विंटलवर कापूस खरेदी केला आहे. पणन महासंघाने अगोदर २,३०० कोटी रुपयांचे कर्ज बँकेकडून घेतले होते; परंतु कापूस खरेदीपोटी शेतकºयांना २,९०० कोटी रुपयांचे चुकारे अदा करायचे होते. त्यातील २,५०० कोटी रुपयांवर चुकारे अदा करण्यात आले होते; परंतु पैसा संपल्याने पणन महासंघाने एक हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठीचे पाऊल उचलले होते. हे कर्ज अखेर पणन महासंघाला मिळाले असून, चुकारे अदा करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३ हजार ३३ कोटी ४७ लाख रुपये अदा करण्यात आले असून, उर्वरित चुकारे करण्यात येत आहेत. पणन महासंघाने आतापर्यंत ६४ लाख क्विंटलवर कापूस खरेदी केला आहे. टाळेबंदीच्या काळात ९ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. पणन महासंघाने कापूस नोंदणी बंद केली असली तरी सध्या कापूस खरेदी सुरू आहे.दरम्यान, मार्जिन मनी म्हणून देण्यात येणारे ९६ कोटी रुपये शासनाने दिले नाहीत, ते देण्याची गरज आहे. कारण एक हजार कोटी रुपयेदेखील पुरणार नसल्याचे पणन महासंघाचे म्हणणे आहे. पणन महासंघाला बँकेकडून एक हजार कोटी रुपयांचे कर्ज प्राप्त झाले असून, शेतकºयांना आतापर्यंत ३ हजार ३३ कोटी ४७ लाख रुपयांचे चुकारे केले आहेत. उर्वरित चुकारे देण्यात येत आहेत. तद्वतच इतरही खर्च जास्त आहे. त्यामुळे आणखी पैशाची गरज आहे.--अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई.

 

टॅग्स :AkolaअकोलाcottonकापूसFarmerशेतकरी