शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस पीक; मराठवाड्यात क्षेत्र घटले, विदर्भात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 13:52 IST

अकोला : राज्यात यावर्षी ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर १०० टक्के (पºहाटी) कापूस पीक पेरणी करण्यात आली आहे

अकोला : राज्यात यावर्षी ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर १०० टक्के (पºहाटी) कापूस पीक पेरणी करण्यात आली आहे. अल्प पावसामुळे मराठवाड्यातील कापसाचे क्षेत्र घटले तर विदर्भातील कापसाचे क्षेत्र मात्र ७० हजार हेक्टरने वाढले आहे. पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञाकरवी वर्तविण्यात येत आहे.यावर्षी राज्यात ४१ लाख ९१ हजार १४४ हेक्टरवर कपाशी पीक पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. तथापि ४१ लाख ९१ हजार ७८२ हेक्टरवर म्हणजेच १०० टक्के पेरणी आटोेपली आहे. मराठवाड्यात मात्र कपाशीचे क्षेत्र घटले असून, पावसाच्या अनिश्चिततेमुळे लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात कापूस पेरणीवर परिणाम झाला आहे. मराठवाड्यात यावर्षी १७ लाख ७५ हजार हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात १४ लाख ८८ हजार हेक्टरवरच पेरणी झाली. उत्तर महाराष्ट्र खान्देशात ८ लाख ६० हजार १०१ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशी पेरणी केली, तर विदर्भात सर्वात जास्त १७ लाख ४९ हजार ९५ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मराठवाड्यातील कपाशी पेरणीची झीज विदर्भ,खान्देशाने भरू न काढल्याने आकडेवारीवरू न दिसते.विदर्भातील अमरावती विभागातील शेतकºयांनी यावर्षी मूग,उडीद पिकांची पेरणी न करता कापूस पेरणीवर भर दिला तर नागपूर विभागातील शेतकºयांनी सोयाबीनऐवजी कापूस पीक पेरणी केली.पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावर्षी शेतकºयांनी हा निर्णय घेतल्याचे कृषी तज्ज्ञाकरवी सांगण्यात येत असले तरी मागच्यावर्षीही पाऊस कमीच होता. तथापि, मागच्यावर्षीच्या खरीप हंगामातील कपाशी पिकाला जे दर मिळाले ते समाधानकारक होते. बोंडअळीचा प्रादुर्भावही कमी असल्याने कापसाची प्रत चांगली होती. यावर्षी मराठवाडा व विदर्भात खूपच कमी पाऊस झाला. विदर्भात कापूस पीक पेरणीला विलंब झाला. त्यानंतर पावसाने दीर्घ दडी मारली.आताही पावसात दम नसून, काही भागात तुरळक तर काही भागात काहीच पाऊस नाही, अशी स्थिती आहे.याचा परिणाम कापूस उत्पादनावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

 अगोदर पाऊस लांबल्याने उशिरा पेरणी केलेल्या कपाशीची वाढ खुंटली होती. आता १२ दिवसांपासून ढगाळ वातावरण व अधूनमधून तुरळक पाऊस असून, शेतकºयांना पिकावर फवारणी करता येत नसल्याने अळ््या, कि डींचा प्रादुुर्भाव वाढत आहे.असेच वातावरण आणखी राहिल्यास कपाशी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.डॉ.मोहन खाकरे,माजी ज्येष्ठ विद्यावेत्ता,शास्त्रज्ञ,डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोलाFarmerशेतकरी