शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 12:54 IST

यावर्षी कापसाची तयारी करण्याकडे शेतकºयांचा कल राहील, असे तज्ज्ञांना वाटते.

अकोला: राज्यात कापूस आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहे; परंतु यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; पण हे सर्व बियाणे उपलब्धता आणि शेतकºयाची आर्थिक स्थिती यावर अवलंबून आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, टाळेबंदी आणि शेतकºयांचे बिघडलेले अर्थचक्र याचा परिणाम यावर्षी खरीप हंगामावर जाणवण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवित आहेत. खरिपात घेण्यात येणाºया पिकाचाही आढावा घेण्यात येत आहे. राज्यात कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांचे क्षेत्र ८० लाख हेक्टर आहे. गतवर्षी राज्यात ४२ लाख हेक्टरवर कापूस बियाणे पेरणी करण्यात आली होती. यात विदर्भात १८ लाख हेक्टर क्षेत्र होते. गतवर्षी कापूस पीक बºयापैकी आले. त्यामुळे कापूस बियाण्याची उपलब्धता आहे; परंतु सोयाबीनला पावसाचा फटका बसल्याने सोयाबीन बियाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीन बियाण्याची उपलब्धता किती, यावर यावर्षी सोयाबीन पेरणीचे क्षेत्र अवलंबून आहे.  या सर्व पृष्ठभूमीवर यावर्षी कापसाची तयारी करण्याकडे शेतकºयांचा कल राहील, असे तज्ज्ञांना वाटते. टाळेबंदी आणि शेतकºयांचे झालेले अपरिमित नुकसान, या सर्व आर्थिक गर्तेत सापडलेल्या शेतकºयांना सावरण्यासाठी पीक कर्जाचे आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज आहे; परंतु विदर्भात कापसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याने कापूस पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठीची तयारी शेतकºयांना करावी लागेल.- डॉ. के. एस. बेग,कापूस तज्ज्ञ,स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृ षी विद्यापीठ, परभणी.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरीcottonकापूस