शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पीक लागवडीचा खर्चही निघणार नाही; शेतकरी चिंतेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 14:18 IST

सोयाबीन, कापूस व ज्वारी पिकांचे उत्पादन बुडाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे

- संतोष येलकरअकोला : पावसाळा संपल्यानंतर महिनाभरापासून सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस व ज्वारी पिकांचे उत्पादन बुडाले असून, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. त्यामुळे पीक लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.यावर्षीचा पावसाळा संपल्यानंतर महिना उलटून गेला; मात्र परतीचा पाऊस बरसणे सुरूच आहे. सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत परतीच्या पावसाने कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन व ज्वारीचे पीक सडले असून, कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. पात्या-फुलेही गळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. पावसाच्या तडाख्यात पिकांचे उत्पादन बुडाल्याच्या स्थितीत पिकांच्या पेरणी ते काढणीपर्यंत लागवडीवर केलेला खर्चही निघणार नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे.पीक लागवडीचा असा आहे एकरी खर्च!यावर्षीच्या पावसाळ्यात सतत पाऊस सुरू असल्याने पीक लागवडीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामध्ये पेरणी, डवरणी, निंदण, कीटनाशकांची फवारणी आणि कापणीपर्यंत सोयाबीन पिकाच्या लागवडीवर एकरी १३ ते १५ हजार रुपये, कपाशी पिकाच्या लागवडीवर एकरी २० ते २२ हजार रुपये आणि ज्वारी पिकाच्या लागवडीवर एकरी ६ ते ७ हजार रुपये शेतकऱ्यांना खर्च करावा लागला; परंतु परतीच्या पावसाने पिकांचे उत्पादन बुडाल्याने, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नसल्याचे वास्तव आहे.शेतकºयांना आता मदतीची आस!परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही. त्यामुळे पीक नुकसान भरपाईपोटी सरकारकडून किती आणि केव्हा मदत मिळणार, याबाबत संकटात सापडलेल्या शेतकºयांना आता आस लागली आहे.परतीच्या पावसाने पिकांचे उत्पादन बुडाले आहे. पिकांच्या लागवडीवर केलेला खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना पीक नुकसान भरपाईपोटी सरकारने सरसकट एकरी २५ ते ३० हजार रुपये मदत दिली पाहिजे.-शिवाजीराव भरणे,शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती