शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

१०० काेटींचा खर्च, अकाेल्यात ४०० पाेलिसांना लक्झरीअस निवासस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 10:37 IST

Luxurious accommodation for 400 Police in Akola : नागपूरनंतर अकाेल्यात अशा प्रकारची भव्य वास्तू पाेलीस कर्मचाऱ्यांना रहिवासासाठी मिळणार आहे़.

- सचिन राऊत

अकाेला : अकाेला जिल्ह्यात पाेलिसांसाठी असलेल्या जवळपास सर्वच वसाहती माेडकळीस आल्यानंतर नव्याने बांधकाम पूर्ण झालेल्या पाेलीस वसाहतीमधील ३७८ लक्झरीअस निवासस्थानांचे आता लवकरच पाेलीस कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे़. सुमारे १०० काेटी रुपयांचा खर्च करून ही निवासस्थाने बांधण्यात आली असून विदर्भातील नागपूरनंतर अकाेल्यात अशा प्रकारची भव्य वास्तू पाेलीस कर्मचाऱ्यांना रहिवासासाठी मिळणार आहे़. या ठिकाणी २ आणि ३ बीएचकेचे लक्झरीअस घरे पाेलिसांना देण्यात येणार असून प्रत्येक घराची आता पाेलीस अधिकाऱ्यांकडून तपासणी सुुरू करण्यात आली आहे़.

 

साडेतीन लाख स्क्वेअर फूट बांधकामावर या आहेत सुविधा...

तीन लाख ५० हजार स्क्वेअर फुटांवर बांधण्यात आलेल्या या इमारतींमध्ये २ आणि ३ बीएचके फ्लॅट आहेत़. या निवासस्थानांतील रहिवाशांसाठी जिम, गार्डन, मंदिर, आकर्षक झाडे यासह अनेक सुविधा या वसाहतीमध्येच देण्यात आलेल्या आहेत़ ५० ते ६० लाख रुपयांचा फ्लॅट घेतल्यानंतर ज्या सुविधा मिळणार नाहीत, त्यापेक्षा अधिक सुविधा या पाेलीस वसाहतींमध्ये ठेवण्यात आल्या आहेत़.

सात मजल्यांच्या सात इमारती

पाेलीस वसाहतींमध्ये भव्य-दिव्य अशा सात इमारती असून प्रत्येक इमारत सात मजल्यांची आहे़. काही इमारतींत ३ बीएचके फ्लॅट असून काही इमारतींत २ बीएचके फ्लॅट आहेत़ अकाेल्यात सर्वाधिक उंचीची इमारत म्हणूनही याच इमारतींची आता नाेंद हाेणार आहे़.

 

पाच वर्षांचे मेटेनन्स कंपनीकडे

दरम्यान, पाेलीस वसाहतीचे बांधकाम पूर्ण झाले असून या वसाहतीला बाहेरून किंवा आतून काहीही झाल्यास त्याची दुरुस्ती करून देण्याचे म्हणजेच मेंटेनन्सचा पाच वर्षांचा खर्च ही बांधकाम करणारी कंपनी करणार आहे़. निवासस्थानांच्या आतमध्ये रहिवाशांनी कुठेही खिळे ठाेकून किंवा रंग खराब केल्यास ती जबाबदारी संबंधित पाेलिसांची राहणार आहे़.

या मैदानांचाही समावेश

पाेलीस वसाहतीच्या आतमध्येच कबड्डी, बास्केटबाॅल, व्हाॅलिबाॅल, खाे-खाे, बॅडमिंटन खेळण्यासाठी मैदान तयार करण्यात आले आहे़ या साेबतच २०० मीटर अंतराचा वाॅकिंग ट्रॅकही या ठिकाणी तयार करण्यात आला असून वाचनासाठी लायब्ररी व रीडिंग रूमही बनविण्यात आली आहे़. तसेच काैटुंबिक कार्यक्रमांसाठी फंक्शन हाॅलही या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे़. त्यामुळे ही वसाहत अकाेल्यातील सर्वात भव्य आणि सुंदर असल्याची माहिती आहे़.

 

या अधिकाऱ्यांनी केला पाठपुरावा

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना यांच्या संकल्पनेत तसेच कार्यकाळात सुरू झालेल्या या वसाहतीचे बांधकाम पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले आहे़. त्यामुळे ही निवासस्थाने लवकरच पाेलीस व त्यांच्या कुटुंबीयांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे़ तत्कालीन पाेलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनीही ही इमारत तातडीने पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्न केले़.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस