शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

अकोल्यात जनजीवन पूर्वपदावर; धोका कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:03 IST

‘लॉकडाऊन’ उघडण्यासंदर्भात ‘अनलॉक’च्या तिसऱ्या टप्प्याची जिल्ह्यात सोमवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देविविध वस्तूंची दुकानेही सम-विषय नियमानुसार सुरू झाली आहेत. हॉटेल, सलून, चहाची दुकाने मात्र बंदच होती.शासकीय कार्यालयात नियमानुसार उपस्थिती होती.

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू असलेले ‘लॉकडाऊन’ उघडण्यासंदर्भात ‘अनलॉक’च्या तिसऱ्या टप्प्याची जिल्ह्यात सोमवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जनजीवन पूर्वपदावर येत आहे; परंतु अकोला शहरासह जिल्ह्यातील कोरोना विषाणू वाढत्या संसर्गाचा धोका कायम असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे.८ जूनपासून जिल्ह्यात खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचे कामकाज सुरू झाले असून, चारचाकी, तीनचाकी (आॅटो) इत्यादी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. तसेच बाजारातील विविध वस्तूंची दुकानेही सम-विषय नियमानुसार सुरू झाली आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र सोमवारी होते. मुख्य बाजारपेठेसह शहरातील लहान-मोठी सर्वच दुकाने सुरू होती. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासह शासकीय कार्यालयातील नियमानुसार उपस्थिती होती. हॉटेल, सलून, चहाची दुकाने मात्र बंदच होती. आॅटोचालकांनाही तब्बल अडीच महिन्यानंतर रोजगार मिळाला. ‘अनलॉक’मध्ये जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी, जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कायम असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.

टप्पानिहाय लॉकडाऊन उघडण्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे; मात्र जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका कायम असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी कामाशिवाय शक्यतोवर घराबाहेर पडू नये. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करून, मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.-जितेंद्र पापळकरजिल्हाधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक