शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आता अकोल्यातही ‘मास्क’, रुमालचा वापर बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 10:39 IST

मास्क, रुमालचा वापर न केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क, रुमालचा वापर करावा, अन्यथा संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी दिला.जिल्ह्यात कोरोनाचे १३ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले आहेत. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यात नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क व रुमाल बांधूनच निघावे, मास्क, रुमालचा वापर न केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १२ एप्रिल रोजी दिला. घराबाहेर पडताना मास्क, रुमालचा वापर न केल्यास संबंधित व्यक्ती कलम १८८ अन्वये पात्र ठरणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात संचार केल्यास वाहन जप्त!जिल्ह्यात कोरोनाचे १३ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले आहेत. ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या रहिवास परिसरातील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांना संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यानुषंगाने प्रतिबंधित क्षेत्रात संचार केल्यास तसेच वाहन चालविल्याचे आढळून आल्यास वाहन जप्त करून परवाना रद्द करण्यात येणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी दिला.

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क, रुमालचा वापर करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात घोषित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात संचार केल्यास कारवाई करण्यात येणार असून, वाहन जप्त करून परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.- प्रा. संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस