शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : हॉटेलिंग थांबले; व्यवसाय ९० टक्क्यांनी घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 14:33 IST

कोरोनाचा धसका लवकर संपला नाही, तर या कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ येण्याची भीती.

अकोला : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर तयार झालेले पदार्थ खाणे टाळणे सुरू केले आहे. त्याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट अशा व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात जाणवत असून, या व्यवसायामध्ये ९० टक्के घट आली आहे. विशेष म्हणजे खाद्य पदार्थांच्या आॅनलाइन आॅर्डरलाही याचा फटका बसला असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत यामध्येसुद्धा ८० टक्के घट झाल्याची माहिती या व्यवसायातील सूत्रांनी दिली.अकोल्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॉफी शॉप, स्वीट मार्ट अशी खाद्यपेय विक्री करणारी लहान-मोठी एक हजारावर दुकाने आहेत. या पैकी १३५ व्यावसायिकांनी खाद्य पेय विक्रेता असोसिएशन स्थापन केली आहे. शहरातील सर्व प्रमुख व्यावसायिक या असोसिएशनचे सदस्य आहेत. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मंगळवारीच या असोसिएशनने बैठक घेऊन ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबाबत जागरूक राहण्याचे निर्देश दिले आहेत. असे असले तरी ग्राहकांनीच आता हॉटेलिंग थांबविल्याचे चित्र आहे. शनिवार, रविवार हे दोन दिवस तर या व्यवसायासाठी सर्वाधिक व्यवसायाचे दिवस असतात; मात्र गेल्या शनिवारी, रविवारीसुद्धा ग्राहक फिरकले नाहीत. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या ही ९० टक्क्यांपर्यंत रोडावली असल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. अलीकडच्या काळात अनेक ग्राहकांनी आॅनलाइन आॅर्डर करून खाद्य पदार्थ मागविणे सुरू केले होते. अकोल्यातही विविध कंपन्यांचे फ्रेंचाईसी म्हणून अनेक हॉटेलची नोंदणी झाली आहे; मात्र हा व्यवसायही आता थंडावला आहे. या व्यवसायावर अंदाजे दहा हजार कामगारांचा उदरनिर्वाह चालतो, त्यामुळे कोरोनाचा धसका लवकर संपला नाही, तर या कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ येण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. निवासी हॉटेलच्या खोल्याही खालीचनिवासी हॉटेल, लॉज, गेस्ट हाउसमधील खोल्याही खालीच आहेत. नवीन आरक्षण नाही आणि ज्यांनी आधी खोल्या आरक्षित केल्या होत्या त्यांनीही आरक्षण रद्द केल्याने या व्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी गर्दी टाळण्यावर सर्वच नागरिकांचा भर आहे. सामाजिक आरोग्यासाठी ती बाब आवश्यकच आहे, त्यामुळे साहजीकच अनेक क्षेत्रांना त्याचा फटका बसला आहे. अकोल्यातील हॉटेल व्यवसाय ठप्प होण्याच्याच दिशेने आहे. जे ग्राहक हॉटेलमध्ये येतात त्यांच्या सुरक्षेसाठीची व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व व्यावसायिकांना दिल्या आहेत.-योगेश अग्रवाल, अध्यक्ष, खाद्यपेय विक्रेता असोसिएशन, अकोला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला