शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाटही धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 10:52 IST

बायोमेडिकल कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट होत नसल्याने कोरोना प्रसाराचा धोका बळावत आहे.

- सदानंद सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बाधित रुग्ण, क्वारंटीन केलेल्या व्यक्तींनी वापरलेल्या वैद्यकीय साहित्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचवेळी राज्यातील हजारो वैद्यकीय व्यावसायिकांनी या कचºयाच्या विल्हेवाटीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तसे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असतानाही ते न घेताच व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू ठेवले आहेत. त्यामुळे बायोमेडिकल कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट होत नसल्याने कोरोना प्रसाराचा धोका बळावत आहे.केंद्रीय वन, पर्यावरण व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने २८ मार्च २०१६ रोजी जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन अधिनियम लागू केले आहेत. त्या कायद्यानुसार जैववैद्यकीय कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे.त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी व त्यांचे प्रमाणपत्रही घ्यावे लागते.वैद्यकीय व्यावसायिकांना ते प्रमाणपत्र मिळण्यासाठीची नियमावलीही प्रदूषण नियंत्रण मंडळाने तयार केली. प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या संस्थांमध्ये निर्माण होणारा जैववैद्यकीय कचºयावर प्रक्रिया आणि विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते; मात्र राज्यातील हजारो व्यावसायिकांनी तसे प्रमाणपत्र प्राप्त न केल्याने त्यांच्याकडे गोळा होणारा बायोमेडिकल वेस्ट आता कोरोना संसर्गाच्या काळात धोकादायक ठरत आहे. त्यांच्याकडून प्रक्रियेविनाच बाहेर टाकल्या जाणाºया कचºयातून रोगाचा प्रसार होण्याची भीतीही निर्माण झाली आहे.

प्रमाणपत्राशिवाय राज्यात ६२ हजार व्यवयाय सुरूप्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्च २०२० मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार राज्यात ६२४१८ वैद्यकीय व्यावसायिकांनी या प्रमाणपत्रासाठी अद्याप साधा अर्जही केलेला नाही. त्यांच्याकडील जैववैद्यकीय कचºयाचे नेमके काय केले जात आहे, ही बाब आता अतिधोक्याची ठरत आहे. राज्यातील १७०३७ व्यावसायिकांनी हे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. त्यांच्याकडील कचºयावर ३० सामायिक कचरा प्रक्रिया केंद्रात विल्हेवाट लावली जात आहे.

प्रमाणपत्र अनिवार्य!कायद्यानुसार वैद्यकीय व्यावसायिक म्हणजे, सर्व रुग्णालये, नर्सिंग होम, दवाखाने, पशुवैद्यकीय संस्था, प्राणी घरे, पॅथॉलॉजिकल प्रयोगशाळा, रक्तपेढी, क्लिनिकल आस्थापना, संशोधन किंवा शैक्षणिक संस्था, आरोग्य शिबिरे, वैद्यकीय किंवा शस्त्रक्रिया शिबिरे, लसीकरण तसेच या नियमाच्या कार्यक्षेत्रात शिबिरे, रक्तदान शिबिरे, शाळांमध्ये प्रथमोपचार कक्ष, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, संशोधन प्रयोगशाळांचा समावेश करण्यात आला आहे. सोबतच सर्व बिगर खाट आरोग्य सेवा संस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जैववैद्यकीय कचरा प्रमाणपत्र प्राप्त करणे अनिवार्य आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला