शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

CoronaVirus : संदिग्ध रुग्णांची समजूत काढताना मनपाची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 10:38 AM

कोविड सेंटरमधील अपुºया सोयी-सुविधा लक्षात घेता उपचारासाठी दाखल होण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांच्या निकटवर्तीय तसेच संपर्कातील संशयित रुग्णांना उपचारासाठी कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी मनपाच्या यंत्रणेची चांगलीच दमछाक होत आहे. कोविड सेंटरमधील अपुºया सोयी-सुविधा लक्षात घेता उपचारासाठी दाखल होण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यांची समजूत काढताना मनपाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कसब पणाला लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने कृषी विद्यापीठात कोविड केअर सेंटरचे गठन केले. या ठिकाणी संशयित रुग्णांना किमान आठ ते दहा दिवस मुक्कामी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु यानंतर कोविड सेंटरमधील मूलभूत सोयी-सुविधा तसेच जेवणाची व्यवस्था दर्जेदार नसल्याचा आरोप रुग्णांकडून होत आहे. याचा परिणाम संशयित रुग्णांवर होत असल्याचे दिसून येत आहे.संशयित रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाताना त्यांची समजूत काढणे मनपा कर्मचाºयांसाठी जिकिरीचे काम झाले आहे.संशयित रुग्णांचे समुपदेशन करण्यात वेळ खर्चीउत्तर झोनमधील अकोट फैल, तारफैल, नायगाव, बैदपुरा, मोमिनपुरा, माळीपुरा, गवळीपुरा, फिरदौस कॉलनी, लकडगंज तसेच पूर्व झोनमधील आंबेडकर नगर, कृषी नगर, पश्चिम झोनमधील खैर मोहम्मद प्लॉट, शिवसेना वसाहत, सोनटक्के प्लॉट, चांदखा प्लॉट आदी भागातील रुग्णांची समजूत काढताना मनपा कर्मचाºयांकडून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. रुग्णांच्या मनात निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांचे निराकरण करावे लागत असल्याची माहिती आहे.

कोविड सेंटरमधील गर्दी वाढली!कृषी विद्यापीठातील कोविड सेंटरमध्ये ६५० खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली होती. आजरोजी येथील सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याची माहिती आहे. त्यावर जिल्हा व मनपा प्रशासनाने शहरातील शासकीय वसतिगृह ताब्यात घेतले असून, त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या