शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

CoronaVirus : वाशिमच्या कोरोनाबाधिताचा वर्धेत मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 17:30 IST

कवठळ (ता.मंगरूळपीर) येथील एका ६३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा शुक्रवार २९ मे रोजी सकाळी २ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सेवाग्राम (जि.वर्धा) येथील  कस्तूरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कवठळ (ता.मंगरूळपीर) येथील एका ६३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा शुक्रवार २९ मे रोजी सकाळी २ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील एका रूग्णाला हृदय रोगाच्या उपचारासाठी सावंगी (जि. वर्धा) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात ८ मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना मधूमेह, उच्च रक्तदाब आणि अर्धांगवायूच्या आजाराचाही त्रास होता. या ठिकाणी त्यांच्या थ्रोट स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवाल १० मे रोजी प्राप्त झाला. त्यात त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना सेवाग्राम  येथील  कस्तूरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गत आठ दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्यांना जीवनदायी प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले; परंतु त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर २९ मे रोजी पहाटे २ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर वर्धा येथील  स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे प्रशासन व आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, वर्धा येथील रुग्णालयात मृत्यू झालेल्या कवठळ येथील  कोरोनाबाधित रुग्णाच्या ‘लो-रिस्क’ संपर्कात एकूण ३२ जण आलेहोते. या सर्वांची प्राथमिक स्तरावर आरोग्य तपासणी करण्यात आली आणि   आरोग्य विभागाच्या १२ चमूने गावात ठाण मांडून घरोघरी सर्वेक्षण केले. यात कवठळ येथील जवळपास १४०० नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी कोणालाही कोणतीही लक्षणे नसून, सर्वांची प्रकृती ठणठणीत होती. तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून अजून ११ दिवस कवठळ येथे आरोग्य विभागाचा विशेष वॉच कायम असून, आता  कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.  गाव केले होते सील कवठळ येथील कोरोनाबाधित ज्या रुग्णाचा ेसेवाग्राम येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तपासणी करून संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने ११ मे रोजीच कवठळ गाव सील केले होते. त्याशिवाय  सावधगिरीचा उपाय म्हणून बाहेरगावावरून येणाºयांना प्रवेशबंदीही करण्यात आली होती.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या