शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

CoronaVirus : अकोल्यात आणखी एकाचा मृत्यू; १२ नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा ९१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 11:40 AM

बुधवार, ८ जुलै रोजी अकोला शहरातील आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देजिल्हाभरात १२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.एकूण बाधितांची संख्या १७९१ वर गेली आहे.

अकोला : अकोल्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, या संसर्गजन्य आजारामुळे बळी पडणाऱ्यांची व आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. बुधवार, ८ जुलै रोजी अकोला शहरातील आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तर जिल्हाभरात १२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे मृतांचा आकडा ९१ झाला आहे. तर एकूण बाधितांची संख्या १७९१ वर गेली आहे.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी एकूण २०९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर उर्वरित १९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्य नऊ महिला व तीन पुरुष आहेत. यापैकी तीन जण अकोट येथील, तेल्हारा, बोरगाव मंजू व पारस येथील प्रत्येकी दोन जण, तर बाळापूर, अकोला शहरातील सातव चौक व वाशीम बायपास येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.६० वर्षीय महिला दगावलीअकोला शहरातील वाशिम बायपास भागातील एका ६० वर्षीय महिलेचा बुधवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेस ३० जून रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ९१ वर गेला आहे. आतापर्यंत १३३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३६७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या