शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

Coronavirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू, १४ पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ११०६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 18:58 IST

Coronavirus in Akola : दिवसभरात दोघांचा मृत्यू, १४ पॉझिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या ११०६

अकोला:  अकोल्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, गुरुवार, १८ जून रोजी दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ११० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९६ अहवाल निगेटीव्ह तर १४ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज सायंकाळी १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील चार जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे तर उर्वरित १३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज दोघा जणांचा मृत्यू झाला. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ११०६ झाली आहे. आजअखेर ३२४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ७७५८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७४३९, फेरतपासणीचे १३३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७७४१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६६३५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ११०६ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे. आज १४ पॉझिटिव्ह आज दिवसभरात १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.त्यात तीन महिला व एक पुरुष आहे. ते शिवसेना वसाहत, शंकर नगर, चांदुर खडकी व खडकी येथील रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी दहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व सहा पुरुष आहेत. त्यातील चार जण बाळापूर येथील दोन जण हरिहरपेठ येथील तर उर्वरित गुलजारपुरा, त्रिमुर्तीभवन, जुने शहर. मोठी उमरी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दोघे मयत

दरम्यान, काल (दि.१७) रात्री उपचार घेताना दोघांचा मृत्यू झाला.त्यात कारंजा लाड जि. वाशीम येथील ५७ वर्षीय महिला असून ही महिला दि.१६ रोजी दाखल झाली होती,तिचा काल मृत्यू झाला. तर अन्य एक ७७ वर्षीय पुरुष असून ते हरिहर मंदिर जवळचे रहिवासी आहेत. ते दि.११ रोजी दाखल झाले त्यांचा काल(दि.१७) मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

१७ जणांना डिस्चार्ज

आज दुपारनंतर १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला . त्यात १३ जणांना घरी सोडण्यात आले तर चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात १० पुरुष आणि सात महिला आहेत. त्यात खदान येथील तीन जण, बाळापूर येथील दोन जण, तर जठारपेठ, पोलीस क्वार्टर, सिंधी कॅम्प, माळीपुरा, सिव्हील लाईन, अकोटफैल, शिवाजीनगर, मुर्तिजापूर, जुने शहर, हमजा प्लॉट, गंगा नगर, देवी पोलीस लाईन येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

३२४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत ११०६जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ५८ जण (एक आत्महत्या व ५७ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ७२४ आहे. तर सद्यस्थितीत ३२४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला