अकोला : आतापर्यंत संसर्गाची गती मंद असलेल्या कोरोना विषाणूने आता वेग पकडला असून, शहरातील विविध भागात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. रविवार, ३ मे रोजी कोरोना विषाणूने बाधीत झालेले आणखी १२ नवे रुग्ण समोर आले असून, यापैकी दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. विविध भागातील असलेल्या १२ रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी दोन महिला या दि.१ व दि.२ रोजी मयत झाल्या आहेत. त्या बैदपुरा व सिटी कोतवाली परिसरातील रहिवासी होत्या.तर उर्वरित रुग्णांपैकी तिघे मोमीनपुरा , पाच जण बैदपुरा तर दोघे जण न्यू भीमनगर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने अर्धशतक गाठले असून, आतापर्यंत ५२ जणांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६ आहे. कोविड आजारामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे.आज प्राप्त अहवाल- ५४पॉझिटीव्ह-१२निगेटीव्ह- ४२
CoronaVirus in Akola : आणखी बारा पॉझिटिव्ह; दोन महिलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 11:13 IST