शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

CoronaVirus : अकोला चारशेच्या उंबरठ्यावर; दिवसभरात एकाचा मृत्यू, १९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 18:24 IST

रविवार, २४ मे रोजी दिवसभरात एका वृद्ध महिलेचा मृत्यू आणि १९ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

ठळक मुद्देमृतकांचा आकडा २४, तर एकूण रुग्णसंख्या ३९७ झाली आहे. रविवारी दिवसभरातआणखी १९ जणांची भर पडत एकूण आकडा ३९७ झाला आहे.सद्यस्थितीत १४४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु.

अकोला : कोरोना संक्रमणाचा वेग काही केल्या कमी होण्याची चिन्हे नसून, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या चारशेच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली आहे. रविवार, २४ मे रोजी दिवसभरात एका वृद्ध महिलेचा मृत्यू आणि १९ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. मृतकांचा आकडा २४, तर एकूण रुग्णसंख्या ३९७ झाली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत १४४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.विदर्भात नागपूरनंतर अकोला शहर कोरोनाचा हॉटस्पाट ठरला आहे. मे महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, शनिवारपर्यत ३७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह होते. रविवारी दिवसभरातआणखी १९ जणांची भर पडत एकूण आकडा ३९७ झाला आहे. रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून १८५ संदिग्ध रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १६६ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या  १९ जणांमध्ये सात महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पाच जण हे तेल्हारा शहर व तालुक्यातील आहेत. तर उर्वरित चौघे हे अकोला शहरातील राऊतवाडी, राजीव गांधी नगर, साईनगर डाबकी रोड, श्रावगी प्लॉट या भागातील आहेत. सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या १० रुग्णांपैकी सात जण हे न्यु तारफैल येथील रहिवासी आहेत. तर अन्य शासकीय गोदाम सिंधी कॅम्प, अशोक नगर, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत. यामधील एक महिला ही जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहे. दरम्यान, शनिवारी रात्री माळीपूरा भागातील एका ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेला २० मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या मृत्यूमुळे कोरोनाच्या बळींची संख्या २४ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत १४४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल-१८५पॉझिटिव्ह-१९निगेटिव्ह - १६६आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-३९७मयत-२४(२३+१),डिस्चार्ज-२२९दाखल रुग्ण (?क्टिव्ह पॉझिटिव्ह)-१४४

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला