शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : ‘त्या’ ४१ डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचा रुग्णालयातच मुक्काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 11:17 IST

एकूण ४१ जण रात्रंदिवस रुग्णालयातच थांबून कोरोनाविरुद्धचे युद्ध लढत आहेत.

- प्रवीण खेते  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत दोन दिवसांत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नऊवर पोहोचली आहे. त्यामुळे डॉक्टर्स अन् इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेसोबतच कुटुंबीयांच्या सुरक्षेचीही जबाबदारी वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाºयांसह वर्ग चारचे कर्मचारी, असे एकूण ४१ जण रात्रंदिवस रुग्णालयातच थांबून कोरोनाविरुद्धचे युद्ध लढत आहेत.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात मनुष्यबळाचा मोठा प्रश्न असतानाच कोरोनासारखे संकट ओढवले आहे. या लढ्यात जिल्हा प्रशासनाची मदत होत असली तरी, खरी कसरत सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर्स व इतर कर्मचाºयांनाच करावी लागत आहे. त्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या नऊवर पोहोचल्याने पर्याप्त सुरक्षा-साधनांशिवाय या ठिकाणी जाणेही अनेक जण टाळत आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी, असे जवळपास ४१ कर्मचारी युद्धपातळीवर रुग्णसेवा देत आहेत.या कार्यात स्वत:ला पूर्णत: झोकून सेवा देत असताना, दुसरीकडे कुटुंबीयांच्याही सुरक्षेची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. रुग्णसेवा अन् कुटुंबाची सुरक्षा दोन्ही गोष्टींना प्राधान्य देत ते सर्व कर्मचारी रात्रंदिवस रुग्णालयात रुग्णसेवा देत आहेत. त्यांचे जेवण रुग्णालयातच होत असले तरी, आरामासाठी शहरातील एका लॉजवर त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कुटुंबीयांशी भेट आता फक्त आॅनलाइनच! कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी हे डॉक्टर्स आणि कर्मचारी घरी न जाता रुग्णालयातच राहत आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबीयांना, विशेषत: मुलाबाळांना प्रत्यक्ष भेटता येत नसल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत व्हिडिओ कॉल्स आणि मेसेजवरच ते संवाद साधून आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत.

शेजाºयांकडून प्रोत्साहनाची गरज!आरोग्य विभागात विशेषत: कोरोना रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने शेजाºयांकडून कुटुंबीयांना मिळणाºया वागणुकीचा अनुभव अनेक कर्मचाºयांनी घेतला आहे; पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढ्यात स्वत:च्या जीवाची बाजी लावणाºया या आरोग्य कर्मचाºयांसह त्यांच्या कुटुंबीयांना शेजाºयांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोलाdoctorडॉक्टरAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय