शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

CoronaVirus in Akola :  सहाशेचा टप्पा ओलांडला; आणखी २४ पॉझिटिव्ह, एकूण बाधीत ६०५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 11:45 AM

१ जून रोजी आणखी २४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांची संख्या ६०५ वर गेली आहे.

ठळक मुद्देसोमवारी आणखी २४ रुग्णांची भर पडून हा आकडा ६०५ वर गेला सोमवारी सकाळी ५८ अहवाल प्राप्त झाले.४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३४ अहवाल निगेटिव्ह आहेत.

अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाच्या रुग्णवाढीचे सत्र सुरुच असून, १ जून रोजी आणखी २४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांची संख्या ६०५ वर गेली आहे.  अकोला जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, रुग्णसंख्या लक्षणीय गतीने वाढत आहे. त्यामुळे अकोला जिल्हा सध्या कोरोनाचा विदर्भातील ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. रविवार, ३१ मेपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५८१ होती. यामध्ये सोमवारी आणखी २४ रुग्णांची भर पडून हा आकडा ६०५  वर गेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल लॅब’कडून सोमवारी  सकाळी   ५८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २४  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३४ अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात १२ महिला व १२ पुरुष आहेत. त्यात पाच जण रामदास पेठ येथील, तीन जण हरिहरपेठ येथील, दोन जण कमलानगर, दोन जण आंबेडकर नगर येथील तर उवरित खैर मोहम्मद प्लॉट, सिंधी कॅम्प,  खदान, गुरुनानक नगर कौलखेड,  रणपिसेनगर,  मुजफ्फरनगर,  अनिकट पोलीस लाईन,  नुरानी मशिद जवळ खदान, खडकी,  सरकारी गोदाम खडकी,  भरतनगर व  कोकनवाडी मुर्तिजापूर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारासाठी संदर्भित केलेल्या ५८ वर्षिय महिलेचा काल मृत्यू झाला. ही महिला दि.२६ मे रोजी दाखल झाली होती. तिला दि.२९ मे रोजी नागपुर येथे हलविण्यात आले होते.  रविवार, ३१ मे रोजी तिचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.  जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची सख्या आता ३३ झाली आहे. यामध्ये एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येचा समावेश आहे.  आतापर्यंत एकून ४३२ जणंना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत १४९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

प्राप्त अहवाल-५८पॉझिटीव्ह-२४निगेटीव्ह-३४

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल- ६०५मयत-३३(३२+१),डिस्चार्ज- ४३२दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १४० 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला