शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : अकोल्यात आणखी सात पॉझिटीव्ह; सातही रुग्ण पातुरचे, रुग्ण संख्या ९

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 12:36 IST

अकोला शहरातील दोन व पातुर तालुक्यातील आणखी नवे सात असे एकूण ९ कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

ठळक मुद्देनागपूर येथील प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त.सातही नवे रुग्ण पातुर तालुक्यातील.मेडशीच्या कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कात आल्याने झाली बाधा.

अकोला : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अकोला शहरात शिरकाव केल्यानंतर आता जिल्ह्यातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, पातुर तालुक्यातील सात संदिग्ध रुग्णांचे अहवाल बुधवारी रात्री उशीरा ‘पॉझिटिव्ह’ आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी दिली. अकोला शहरातील दोन व पातुर तालुक्यातील आणखी नवे सात असे एकूण ९ कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. हे सातही रुग्ण पातुर येथील असून, ते वाशिम जिल्ह्यातील एक कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे अकोला शहरासह पातुर शहरातही दहशतीचे वातावरण पसरले आहे.आतापर्यंत अकोला जिल्हा कोरोनाच्या सावटापासून दुर होता; परंतु मंगळवारी जिल्ह्यातील पहिल्या रुग्णांची नोंद अकोला शहरातील बैदपूरा भागात झाली. त्यानंतर अवघ्या १८ तासांतच अकोट फैल भागातील एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा बुधवारी २ झाला होता. यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बाधीत रुग्ण आढळलेला भाग व लगतचा परिसर सिल केला.काही दिवसांपूर्वीच वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे कोरोनाचा एक बाधित रुग्ण आढळला होता. हा रुग्ण दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतल्यावर पातुर येथील १५ लोकांच्या संपर्कात आला होता. परंतु, त्या रुग्णाचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेले पातुरातील १५ जणांनी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. या १५ संदिग्ध रुग्णांना येथील आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. त्यांचे सर्वांचे ‘स्वॅब’ वैद्यकीय चाचणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. गुरुवातील यातील ७ जणांचे वैद्यकीय चाचचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पातुरकरांची झोप उडाली आहे. इतर संदिग्ध रुग्णांचे अहवाल देखील येणार असून, आरोग्य विभागाचे त्याकडे लक्ष लागून आहे.पातुरची सीमा सीलपातुरातील सात जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पातुरात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले असून, सकाळीच पातुर शहराची सीमा सील करण्यात आली होती.कोरोना संसर्गग्रस्तांचे अद्यावत अहवालअकोला जिल्ह्यात एकूण तपासलेले नमुने- १४८अहवाल प्राप्त संख्या-१०९पॉझिटिव्ह -९निगेटिव्ह-१००

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाPaturपातूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस