CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ५८ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:04 PM2020-09-20T13:04:45+5:302020-09-20T13:04:51+5:30

रविवारी मुर्तीजापूर तालुक्यातील कुरुम येथील ५३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

CoronaVirus in Akola: Another victim; 58 new positives | CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ५८ नवे पॉझिटिव्ह

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ५८ नवे पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार २० सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील आणखी एक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २०९ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६४९३ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५८ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८४ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये २२ महिला व ३६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मुर्तिजापूर येथील २१ जणांसह वाडेकर लेआऊट येथील सहा, जीएमसी व जुने शहर येथील प्रत्येकी चार, मोठी उमरी व चांन्नी ता. पातुर येथील प्रत्येकी तीन, पातुर येथील दोन, सुधीर कॉलनी, आनंद नगर,शास्त्री नगर, अकोट, गीता नगर, हिवरखेड, खदान, अकोला शहर, जठारपेठ, जामठी, सिरसो, बालाजी नगर, घुसर, सुयोग कॉलनी व तापडीया नगर येथील प्रत्येकी एक अशा ५८ रुग्णांचा समावेश आहे.

कुरुम येथील महिलेचा मृत्यू
रविवारी मुर्तीजापूर तालुक्यातील कुरुम येथील ५३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना १७ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.


१५९२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६४९३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४६९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २०९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १५९२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

Web Title: CoronaVirus in Akola: Another victim; 58 new positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.