शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३९ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 19:08 IST

हिवरखेड येथील एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १३६ वर पोहचला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे सत्र सुरुच असून, सोमवार, १७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले. तर हिवरखेड येथील एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १३६ वर पोहचला आहे. एकूण रुग्णसंख्या ३२५१ झाली असून, सोमवारी ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ४२० जणांवर उपचार सुरु आहेत.कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असले, तरी त्यात फारसे यश येत नसल्याचे दिसून येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी आरटीपीसीआर’ चाचणीचे ३३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तीघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३० जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालेल्या तीघांपैकी दोन महिला असून, एक पुरुष आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव, तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड व अकोला शहरातील गुलजारपूरा भागातील हे रुग्ण आहेत.हिवरखेड येथील वृद्धाचा मृत्यूतेल्हारा तालुक्यातयील हिवरखेड येथील ७२ वर्षीय पुरुषाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णास १३ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.३९ जणांना डिस्चार्जसोमवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १६ जणांना, कोविड केअर सेंटर येथून नऊ जण, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून सात जण, आयकॉन हॉस्पिटल येथून सहा जण व हॉटेल रेजन्सी येथून एक जणांना अशा एकूण ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.४२० जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २६९५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १३६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४२० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या