CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३८ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ३७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 11:50 AM2020-06-07T11:50:35+5:302020-06-07T12:27:32+5:30

७ जून रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील एकाच्या मृत्यूची, तर ३८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद घेण्यात आली.

CoronaVirus in Akola: Another victim; 38 new positive, death toll 37 | CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३८ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ३७

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३८ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ३७

Next
ठळक मुद्देमृतकांची एकूण संख्या ३७ झाली आहे.एकूण बाधितांचा आकडाही ७९४ वर गेला आहे.आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात १८ महिला व २० पुरुष आहेत.

अकोला : अकोला जिल्हा व शहरात कोरोना साथीचे थैमान थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची व बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, ७ जून रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील एकाच्या मृत्यूची, तर ३८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद घेण्यात आली. त्यामुळे मृतकांची एकूण संख्या ३७ झाली आहे. तर एकूण बाधितांचा आकडाही ७९४ वर गेला आहे.
मे महिन्यापासून रुग्णवाढीच्या सत्राने वेग घेतला असून, महिनाभराच्या कालावधीत अकोला शहर कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून उदयास आला. शनिवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ७५६ होती. यामध्ये रविवारी ३८ रुग्णांची भर पडत हा आकडा ७९४ वर गेला. रविवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण १३८ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३८ पॉझिटिव्ह, तर उर्वरित १०० निगेटिव्ह आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात १८ महिला व २० पुरुष आहेत. यामध्ये आठ जण खदान येथील, चार जण अकोट फैल, चार जण तार फैल, चार जण खडकी, चार जण जीएमसी क्वार्टर येथील तर उर्वरित रजपुतपुरा, अंत्री मलकापूर, हरिहरपेठ, वाशीम रोड, छोटी उमरी नाका, द्वारका नगर मोठी उमरी, गजानन नगर, बापूनगर टेलिफोन कॉलनी, कैलास टेकडी, तपे हनुमान, देशमुख फैल,  ध्रुव अपार्टमेंट जिल्हा स्त्री रुग्णालया समोर आणि नायगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी एका ८५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण रजपुतपुरा येथील रहिवासी असून , त्याला ३१मे रोजी दाखल केले होते. या रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३७ वर पोहचला आहे. एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येची नोंद आहे. आतापर्यंत ५३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत २२६ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्राप्त अहवाल-१३८
पॉझिटीव्ह-३८
निगेटीव्ह-१००

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-७९४
मयत-३७(३६+१),डिस्चार्ज-५३१
दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२२६

Web Title: CoronaVirus in Akola: Another victim; 38 new positive, death toll 37

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.