शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; ३८ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 12:18 IST

मुर्तीजापूर येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची नोंद रविवार, १९ जुलै रोजी झाली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०३ झाला आहे.३८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या २१२५ वर गेली आहे. यामध्ये अकोट येथील ३३ रुग्णांचा समावेश आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मुर्तीजापूर येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची नोंद रविवार, १९ जुलै रोजी झाली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०३ झाला आहे. तर रविवारी ३८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या २१२५ वर गेली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून रविवारी सकाळी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे २६७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २२९ जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये १६ महिला व २२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये अकोट येथील ३३ जण, मुर्तीजापूर येथील ३ जण, तर उर्वरित अकोला शहरातील जुना तारफैल व रामनगर भागातील रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यूकोरोनावर उपचार घेत असलेल्या मुर्तीजापूर येथील ६० वर्षीय पुरुषाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. सदर रुग्णास १६ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १०३ झाली आहे.३४० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१२५ असून, यापैकी १०३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १६८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३४० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला