शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

CoronaVirus in Akola : दिवसभरात ९६ रुग्ण वाढले; ८५ बरे झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 6:43 PM

यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४६११ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार, ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ९६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४६११ वर गेला आहे. दरम्यान, ८५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ५९६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९६ पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५०० जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. सकाळच्या अहवालांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कान्हेरी येथील २२, तेल्हारा येथील सहा, बाळापूर येथील चार, सस्ती, आळंदा, गोरेगाव व हातरुन येथील प्रत्येकी दोन, पातूर, चान्नी, सिंदखेड, लहान उमरी, मुर्तिजापूर, राऊत वाडी, जूना कपडा बाजार व श्रावगी प्लॉट येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळच्या अहवालांमध्ये बेलुरा येथील १८, चोहट्टा बाजार येथील नऊ, कौलखेड, तेल्हारा, सिंधी कॅम्प व केशवनगर येथील प्रत्येकी दोन, अडगाव ब्रु., पातूर, बाळापूर नाका, गणेश कॉलनी, वाशिम बायपास, बळवंत कॉलनी, शिवसेना वसाहत, जठारपेठ, लहान उमरी, हरिहर पेठ, आळसी प्लॉट, रामनगर व गजानन नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.८५ जणांना डिस्चार्जशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५६, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १६, मुर्तिजापूर उप जिल्हा रुग्णालयातून आठ, आयकॉन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक तर हॉटेल रणजित येथून तीन अशा एकूण ८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.९४१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६११ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३५०५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९४१ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला