शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Akola  : ४१ जणांचे वैद्यकीय अहवाल ‘निगेटीव्ह’; २४ नव्याने दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 17:42 IST

२४ संशयित रुग्ण नव्याने दाखल झाले असून, बुधवारी सकाळीच त्यांचे ‘स्वॅब’तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे वाडेगाव येथून १८ संशयित रुग्णांना जीएमसीत दाखल करण्यात आले.बुधवारी दिवसभरात इतर ६ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

अकोला : सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत कोरोनाचे ६५ संशयित रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी ४१ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल ‘निगेटीव्ह’ आले आहेत. यामध्ये प्रलंबित ११ रुग्णांपैकी ८ रुग्णांचा समावेश आहे. तर २४ संशयित रुग्ण नव्याने दाखल झाले असून, बुधवारी सकाळीच त्यांचे ‘स्वॅब’तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा बाधित रुग्ण नसला, तरी संशयित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी रात्री उशीरा वाडेगाव येथून १८ संशयित रुग्णांना जीएमसीत दाखल करण्यात आले, तर बुधवारी दिवसभरात इतर ६ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचे ‘स्वॅब’ घेण्यात आले असून, ते नागपूर येथे पाठविण्यात आले. यातील आठ रुग्णांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे, तर उर्वरीत रुग्णांना वार्ड क्रमांक २१, २४ मध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आहे. बुधवारी एकाही रुग्णाला सुट्टी देण्यात आली नसून, तिन्ही वार्डात एकूण ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.११७ रुग्णांची वैद्यकीय तपासणी कोरोना समुपदेशन कक्षात मंगळवारी ११७ रुग्णांची तपासणी करु न त्यांना समुपदेशन करण्यात आले. कक्ष सुरु झाल्यापासून आतापर्यंत दोन हजार ८५९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.‘त्या’ निगेटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूसर्वोपचार रुग्णालयात स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागात एक महिला २८ मार्च रोजी दाखल झाल्याची माहिती आहे. उपचारादरम्यान त्या महिलेची प्रकृती ठिक नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची कोरोना तपासणीसाठी ‘स्वॅब’पाठविले होते. दरम्यान ३० मार्च रोजी त्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. बुधवारी त्या रुग्णाचा वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आला.विदर्भात एकच ‘व्हीआरडीएल’लॅबअकोल्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी नागपूर येथील ‘व्हीआरडीएल’ लॅब केली जाते. ही विदर्भातील एकमेव लॅब आहे. तर दुसरीकडे संशयित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या लॅबवर कामाचा ताण वाढला असून, अहवाल मिळण्यास विलंब होत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला