शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : ४०० व्यक्ती निरीक्षणात; ७७ वैद्यकीय अहवाल प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 10:37 IST

रुग्णांच्या निकट व दूरस्थरीत्या संपर्कात आलेल्या तब्बल ४०० व्यक्ती या वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही; मात्र आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या रुग्णांच्या निकट व दूरस्थरीत्या संपर्कात आलेल्या तब्बल ४०० व्यक्ती या वैद्यकीय निरीक्षणात आहेत. यापैकी ६० व्यक्ती या अत्यंत निकट संपर्कातील व्यक्ती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी तब्बल ७७ रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याने अकोलेकरांवरील धोका संपलेला नाही, त्यामुळे लॉकडाउनच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, अकोला शहरात पहिल्या टप्प्यात दोन जण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील पहिल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील १४ व्यक्ती होत्या तर दूरस्थ संपर्कातील ३० व्यक्ती होत्या. निकट असलेल्या व्यक्ती ह्या जास्त जोखमीच्या समजल्या जात असल्याने त्यांचेही घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यातील १० जणांचे अहवाल प्राप्त असून, तिघे पॉझिटिव्ह तर अन्य सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर कमी जोखमीच्या ३० व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.अकोल्यातीलच दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या निकट संपर्कातील आठ व्यक्ती होत्या. त्यातील सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर कमी जोखमीच्या ४९ जणांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बाळापूर येथून दाखल झालेल्या एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या (मयत झालेल्या) निकट संपर्कात पाच जण होते. त्या पाचही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तरीदेखील त्यांना संस्थागत अलगीकरणात तर अन्य २२ व्यक्ती जे दूरस्थ संपर्कात होते त्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एकूण जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांच्या अत्यंत निकट संपर्कात ६० जण होते तर दूरस्थ संपर्कात ३४० जण आल्याचे प्रशासनाने शोधून काढले. हे सर्व जण सध्या संस्थागत वा गृह अलगीकरणात असून, ते वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

पातुरात ३१ रुग्ण क्वारंटीनपातूर येथील सात व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यांच्या निकट संपर्कात असलेल्या ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दूरस्थ संपर्कातील २३९ जणांचेही गृह अलगीकरण करण्यात आले असून, ३१ जण अद्यापही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संस्थागत अलगीकरणात आहेत.

खामगावच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील बाळापुरातील ‘ते’ दोघे निगेटिव्ह!पश्चिम वºहाडातील बुलडाण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २१ झाली असून, बुलडाणा हे हॉटस्पॉट झाले आहे. याच रुग्णांपैकी खामगाव येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले बाळापूरचे दोघे जण असून, त्यांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून तेही संस्थागत अलगीकरणात आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस