CoronaVirus in Akola :  आणखी १९ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३१९५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 12:12 PM2020-08-14T12:12:27+5:302020-08-14T12:12:35+5:30

शुक्रवार, १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात आणखी १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३१९५ वर गेली आहे.

CoronaVirus in Akola: 19 more positive; The total number of patients is 3195 | CoronaVirus in Akola :  आणखी १९ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३१९५

CoronaVirus in Akola :  आणखी १९ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३१९५

Next

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या, तरी या संसर्गजन्य आजाराचा प्रादूर्भाव थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे सत्र सुरुच असून, शुक्रवार, १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात आणखी १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३१९५ वर गेली आहे.
नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदरही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १६९ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १९ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १५० जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालेल्या १९ जणांमध्ये पाच महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील पाच जणांसह, अकोल्यातील केळकर रुग्णालय व बार्शीटाकळी शहरातील प्रत्येकी तीन जण, अकोट येथील दोन जण, अकोट तालुक्यातील चंडिकापूर, अकोला तालुक्यातील पाळोदी, मुर्तीजापूर, अकोला शहरातील शिवसेना वसाहत, खदान व कौलखेड भागातील प्रत्येकी अशा एकूण १९ रुग्णांचा समावेश आहे.

५४६ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१९५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २५१८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५४६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: CoronaVirus in Akola: 19 more positive; The total number of patients is 3195

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.