शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Akola : वाडेगावातील १८ पैकी ९ जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 17:01 IST

उर्वरित ९ जणांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्दे उर्वरित ९ जणांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे. इतरही रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असून, त्यांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल अद्याप आले नाहीत.

अकोला : वाडेगाव येथील १८ संदिग्ध रुग्णांपैकी ९ जणांचे वैद्यकीय अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आले. तर उर्वरित ९ जणांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे.वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळापूर पोलिसांच्या मदतीने मंगळवारी रात्री उशिरा येथील १८ जणांना कोरोनाचे संदिग्ध रुग्ण म्हणून सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. हे १८ जण दिल्ली येथे गेले होते; परंतु ते २ मार्च रोजीच अकोल्यात परतल्याचे तसेच कोणीही विदेशवारी केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मंगळवार ३१ मार्च रोजी कोरोनाचे संदिग्ध म्हणून स्थानिक आरोग्य विभागाने या १८ जणांना आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. त्यांचे वैद्यकीय चाचणी नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी सकाळी यातील ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह असल्याचे समोर आहे. तर उर्वरित ९ जणांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. या सर्वांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. याशिवाय इतरही रुग्णांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असून, त्यांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल अद्याप आले नाहीत.

समुपदेशनानंतर दोघांना केले दाखल!दिल्ली येथे नोकरीनिमित्त गेलेल्या अकोल्यातील दोघांना शुक्रवारी प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना समुपदेशन कक्षात आणले होते. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना आयसोलेशन कक्षात दाखल होण्यास सांगितले; परंतु यावेळी दोन्ही संदिग्ध रुग्णांना दाखल होण्यास नकार दिला. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते; मात्र वैद्यकीय अधिकाºयांनी केलेल्या समुपदेशनानंतर त्या दोघांना आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले. हे दोन्ही संदिग्ध रुग्ण १५ दिवसांपूर्वीच अकोल्यात परत आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस