शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : पातुरातील ४० जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 11:19 IST

शिर्ला व पातूरच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

शिर्ला/पातूर : पातूरच्या सात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४० कोरोना संदिग्धांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शिर्ला व पातूरच्या नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.दिल्लीतील एका धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ जणांपैकी सात जण पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना अकोला सर्वोपचार रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तातडीने हलविण्यात आले होते. त्यांचे थ्रोट स्वॅब नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. ४७ पैकी सात पॉझेटिव्ह वगळता ४० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पातूर कोरोनामुक्त होण्याची प्रतीक्षा शिर्ला व पातूर येथील नागरिकांना आहे. दरम्यान, ३ हजार ९०५ कुटुंबातील २१ हजार २६८ नागरिक यापैकी एकही व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे आढळले नाही. सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून दहशतीखाली वावरत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. २१ हजार २६८ नागरिक सर्व सीमा बंद केल्याने होम क्वारंटीन झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचा मुक्त संचार थांबला आहे. त्यामुळे वाढती रुग्ण संख्या थांबविण्यात आरोग्य विभाग, नगर प्रशासन, शिर्ला ग्रामपंचायत प्रशासन तथा पोलिसांना यश आले आहे. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याने कुणीही घराबाहेर पडू नका कारण कोरोनाला पातुरातून पळवायचे आहे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव यांनी केले आहे. (वार्ताहर)

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPaturपातूर