शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यावरही कोरोनाचे सावट; सार्वजनिक उत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 18:16 IST

यंदा अकोला शहरात होणारा सार्वजनिक पोळ्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

अकोला : इतर सणाप्रमाणेच बळीराजाच्या पोळ्यावरही कोरोनाचे सावट असून, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शेतकऱ्यांनी आपआपल्या घरीच पोळा साजरा करावा, या जिल्हाधिकाºयांच्या आवाहनास प्रतिसाद देत यंदा अकोला शहरात होणारा सार्वजनिक पोळ्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.अकोला शहरातील पोळा चौक येथे दरवर्षी सार्वजनिक पोळा कार्यक्रम साजरा केला जात असतो. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर हा कार्यक्रम साजरा करण्यासाठीची परवानगी व चर्चा करण्यासाठी माजी आमदार तुकाराम बिरकड यांच्या नेतृत्वाखाली पोळा उत्सव समितीचे आयोजक अनिल मालगे, प्रा. सदाशिव शेळके, गजानन वानखडे, प्रमोद वानखडे, सुरेश मनोहर भिरड,रवींद्र मधुकर वानखडे, शेख नजीर ऊर्फ राजू भय्या, रवी भाकरे, गोपाल मांडेकर, संतोष ढवळे , विशाल मेहरे, नामदेव वानखडे, गजानन सांगे, राजेंद्र जुनगळे ,कुटाफळे ,राजेंद्र गोतमारे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात कोरोनाचा सुरू असलेला कहर लक्षात घेता, यावर्षी इतर सणाप्रमाणे पोळासुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या घरीच साजरा करावा, असे जिल्हाधिकारी यांनी भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला सांगितले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, शेतकºयांनी घरीच आपल्या दैवताची पूजा करावी व हा सण साजरा करावा, असे आवाहन पोळा उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.दरवर्षी जुन्या शहरातील पोळा चौकात होणारी उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा तथा शेतकरी सन्मान सोहळा रद्द करण्यात आला असून, याठिकाणी कोणीही शेतकरी बांधवांनी आपली बैलजोडी आणू नये, तसेच नागरिकांनीही या ठिकाणी येऊ नये, अशी विनंती पोळा उत्सव समितीचे आयोजक अनिल मालगे यांनी समस्त शेतकरी बांधवांना केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाIndian Festivalsभारतीय सण