कोरोना : चीनमध्ये गेलेले १४ विद्यार्थी अकोल्यात परतले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:03 AM2020-01-31T11:03:55+5:302020-01-31T11:44:54+5:30

कोरोना व्हायरसचे संकट पाहता तेथील विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना मायदेशी पाठविण्यात येत आहे.

corona virus : 14 students returned to Akola From China | कोरोना : चीनमध्ये गेलेले १४ विद्यार्थी अकोल्यात परतले!

कोरोना : चीनमध्ये गेलेले १४ विद्यार्थी अकोल्यात परतले!

Next

- प्रवीण खेते

अकोला : कोरोना व्हायरसचे मोठे संकट असताना चीनमध्ये गेलेले हजारो भारतीय मायदेशी परतत आहेत. यामध्ये अकोल्यातील १४ विद्यार्थीही गत काही दिवसात अकोल्यात परतले आहेत. हे विद्यार्थी ‘वुहॅन’ विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. कोरोना व्हायरसचे संकट पाहता तेथील विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना मायदेशी पाठविण्यात येत आहे. यामध्ये अकोल्याच्या विद्यार्थ्यांचाही समावेश असून, या विद्यार्थ्यांची चार वेळा वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती चीनमधून परतलेल्या अकोल्यातील गिरिजा खेडकर या विद्यार्थिनीने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
भारतातील हजारो लोक रोजगार आणि शिक्षणासाठी चीनमध्ये गेलेले आहेत. यामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे; पण कोरोना व्हायरसमुळे गत काही दिवसांपासून चीनमधील अनेक भारतीय मायदेशी परतत आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. कोरोना व्हायरसचा धोका वाढल्याने तेथील विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांना मायदेशी पाठविण्यात येत आहे. अकोल्यातील १४ विद्यार्थी हे तेथील ‘वुहॅन’ विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. हिवाळी सुट्ट्यांमुळे यातील काही विद्यार्थी हे कोरोना व्हायरस येण्यापूर्वीच अकोल्यात परतले होते; मात्रजे विद्यार्थी चीनमध्ये अडकले होते त्यांना विद्यापीठामार्फत मायदेशी पाठविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या वाढण्याची शक्यता
चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धोका पाहता, विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. या सुट्ट्या आणखी महिनाभर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती, येथील विद्यार्थिनी गिरिजा खेडरने दिली.

चार वेळा होत आहे वैद्यकीय तपासणी
चीनमधून येणाºया विद्यार्थ्यांची भारतात पोहोचेपर्यंत चार वेळा वैद्यकीय तपासणी केली जात आहे. यापैकी तीन तपासण्या चीनमध्येच करण्यात येत आहेत, तर चौथी तपासणी भारतात पोहोचताच विमानतळावर केली जात आहे.

 

Web Title: corona virus : 14 students returned to Akola From China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.