शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कोरोनाने घेतला आणखी दोघांचा बळी; १९ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 11:56 IST

सोमवार, ३ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू झाला.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. सोमवार, ३ आॅगस्ट रोजी कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ११२ झाला आहे. आणखी १९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २६९८ वर पोहचली आहे.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेल्या अकोल्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून सोमवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे ५० अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३१ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सात महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये बाभूळगाव येथील तीन, रेणुका नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, तर कापशी, उमरी, सिव्हिल लाईन, घोडेगाव ता. तेल्हारा, सहकार नगर, सुवर्णा नगर, पी एस मुख्यालय, मूर्तिजापूर, लोहारा ता. बाळापूर, डाबकी रोड, खदान व जवाहर नगर येथील एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.दाळंबी, लोहारा येथील दोघांचा मृत्यूसोमवारी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापैकी एक रुग्ण हा दाळंबी येथील ७१ वर्षीय पुरुष असून, त्यांना २ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा रुग्ण बाळापूर तालुक्यातील लोहारा येथील ५१ वर्षीय पुरुष असून, त्यांना १ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.४४० जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६९८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २१४६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४४० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल- ५०पॉझिटीव्ह- १९निगेटीव्ह- ३१

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- २३३२+३६६=२६९८मयत-११२डिस्चार्ज- २१४६दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-४४० 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला