हॉटेलमध्ये मिळणारे फास्टफूडचे पदार्थ घरीच तयार
केक घरीच तयार करण्यात येतोय
हॉटेलमध्ये जेवायला जाणे टाळले
दाढी, कटिंग घरीच केली जाते
नवीन कपडे घेणे बंद केले
विजेच्या वस्तूंचा वापर कमी केला
कुठे कुठे केली कॉस्टकटिंग
१.कोरोनामुळे आर्थिक अडचणी वाढल्याने अनेक कुटुंबं हॉटेलमध्ये जेवण टाळत आहेत. हॉटेलमधील पदार्थ घरीच केल्या जातात.
२.या स्थितीत विजेच्या वस्तूंचा वापर कमी केला जात आहे. लग्न, समारंभ बंद असल्याने नवीन कपडेही घेणे टाळत आहे.
३.लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी घरीच कटिंग, दाढी करणे शिकले, तसेच केक बनविण्याचे प्रशिक्षणही घेतले. त्यामुळे हे सर्व घरीच होते.
टेरेस गार्डनमुळे भाजीपाल्याचा खर्च वाचला!
लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या भीतीने भाजीपालाही विकत घेतला नाही. त्यामुळे घरीच कुंड्यांमध्ये काही भाजीपाल्यांची रोपे लावली. त्यामुळे महिन्याकाठी भाजीपाल्यावर होणारा काही खर्च वाचल्याचे एका कुटुंबाने सांगितले.
हॉटेलिंग थांबल्याने दीड हजार वाचले!
कोरोनाआधी प्रत्येक वाढदिवसाला सर्व कुटुंब हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात होते; परंतु लॉकडाऊन काळात बहुतांश पदार्थ घरीच बनविणे शिकले. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवायला जात नसल्याने प्रत्येक वाढदिवसाला दीड हजार रुपये वाचल्याचे एका कुटुंबाने सांगितले.
केक व दाढी घरीच; पाचशे बचत!
लाॅकडाऊनमध्ये बाहेर सर्वच बंद होते. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या वाढदिवसाला केक मिळत नव्हता. तसेच दाढी करायची असल्यास तीही शक्य नव्हती. या दोन्ही गोष्टी घरीच करणे शिकलो. त्यामुळे महिन्याला पाचशे रुपये बचत होत असल्याचे एका कुटुंबाने सांगितले.