शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संदिग्ध रुग्णाची तपासणी करणारा डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अकोल्याला हलविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 16:46 IST

वैद्यकीय तपासणी आणि नमुने तपासणीसाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

बाळापूर : खामगाव तालुक्यातील चितोडा येथील कोरोनाबाधित रुग्णावर बाळापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञाला तालुका प्रशासनाने ५ एप्रिल रोजी रात्रीच पुढील उपचारासाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी व नुमने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.२९ मार्च रोजी सकाळच्या सुमारास खामगाव तालुक्यातील चितोडा येथे २३ वर्षीय कोरोना संदिग्ध असलेल्या २३ वर्षीय रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर खासगी प्रयोगशाळेत रक्त तपासणी करण्यात आली. संबंधित डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञाने खबरदारी घेत, त्या कोरोनाच्या संदिग्ध रुग्णाची तपासणी केली. या दिवशी रुग्णालयात आलेले सर्व रुग्ण आणि डॉक्टर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संबंधित डॉक्टर आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञामध्ये कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसून आल्यामुळे दोघांनाही पुढील वैद्यकीय तपासणी आणि नमुने तपासणीसाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चितोडा येथील युवक कोरोनाचा संदिग्ध रुग्ण असल्याने, त्याच्यावर उपचार करणाºया संबंधित डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञाची तपासणी करण्याच्या दृष्टिकोनातून नगर परिषदेचे मुख्याधिकारी जी.एस. पवार, तहसीलदार, पुरुषोत्तम भुसारी, ठाणेदार नितीन शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. इशरत खान यांनी तातडीने निर्णय घेत, संबंधित डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अकोल्याला पाठविण्याचे ठरविले. तसेच त्यांच्या दवाखान व प्रयोगशाळा परिसरात नगर परिषद प्रशासनाने तातडीने फवारणी केली. या परिसरात प्रवेश बंदी करण्यात येऊन कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. (शहर प्रतिनिधी)खासगी डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना रविवारीच अकोल्याला पाठविण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या सर्व रुग्णांना होम क्वारंटीन करण्यात आले आहे. दोघांचे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर काय लक्षणे आहेत, हे समोर येईल.- डॉ. इशरत खान, वैघकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, बाळापूर

 

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस