कोरोनामुळे अमरावती शारीरिक शिक्षण शिक्षक अधिवेशन पुढे ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:15 PM2020-03-14T18:15:16+5:302020-03-14T18:15:23+5:30

अमरावती येथे होणारे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संजय मैद यांनी दिली.

Corona postponed Amravati physical education teacher convention | कोरोनामुळे अमरावती शारीरिक शिक्षण शिक्षक अधिवेशन पुढे ढकलले

कोरोनामुळे अमरावती शारीरिक शिक्षण शिक्षक अधिवेशन पुढे ढकलले

Next

- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला:अमरावती येथे २६ ते २८ मार्च या कालावधीत शारीरिक शिक्षण शिक्षकांचे अधिवेशन निश्चीत झाले होते .  शासनाने कोरोना बाबत सावध पवित्रा घेत शासकीय कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, मेळावे, यात्रा , सार्वजनिक उपक्रम न घेण्याबाबत  शासकीय कार्यालयांना आदेशीत केले आहे व इतर सामाजिक उपक्रमांबाबत निर्देश जारी करून दक्षता घेण्याचे केलेले आवाहनास प्रतिसाद देत अमरावती येथे होणारे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय शारीरिक शिक्षण संघटनांच्या समन्वय समितीने घेतला असल्याची माहिती क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, विभागीय अध्यक्ष जयदिप सोनखासकर महामंडळ जिल्हाध्यक्ष संजय मैद यांनी दिली.
      महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती, शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती, क्रीडा शिक्षक महासंघ अनगर , क्रीडा विकास परिषद व सहयोगी संघटनांचे वतीने अधिवेशन निश्चीत करण्यात आले होते. सद्य स्थितीतील कोरोना विषाणुच्या संक्रमणाची तीव्रता लक्षात घेता विषाणूचे संक्रमण होऊन धोका निर्माण होऊ नये म्हणून अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून पुढील तारीख समन्वय समितीच्या बैठकीत निश्चीत करणार असल्याचे अधिवेशनाचे निमंत्रक शिवदत्त ढवळे व समन्वय समिती अध्यक्ष विश्वनाथ पाटोळे यांनी सांगितले.
       अधिवेशनासंदर्भात राज्य समन्वय समितीची तातडीची बैठक शनिवारी झाली. या बैठकीस अमरावती महामंडळाचे अध्यक्ष डॉ अरुण खोडस्कर, सचिव डॉ पुरुषोत्तम उपर्वट, क्रीडा विकास परिषदेचे राज्य सचिव ज्ञानेश काळे, समन्वय समितीचे विश्वनाथ पाटोळे, राजेंद्र कोतकर, शिवदत्त ढवळे, संजय पाटील, शरद वाबळे, आनंद पवार, सुनील गागरे, जालिंदर आवारी, जितेंद्र लिंबकर, अजय आळशी, डॉ नितीन चवाळ, अविनाश साळकर या सह विविध जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Corona postponed Amravati physical education teacher convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.