शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
2
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
3
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
4
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
5
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
6
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
8
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
9
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
10
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
11
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
12
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

वृद्धांसाठी कोरोना ठरतोय ‘किलर’; ७१ टक्के बळी ६० पेक्षा अधिक वयाचे

By atul.jaiswal | Published: September 15, 2020 11:00 AM

सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १४ दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एकूण ३४ रुग्णांपैकी २५ जण हे ६० ते ८० या वयोगटातील होते.

ठळक मुद्दे२५ जण हे ६० ते ८० या वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ६० ते ७० वयोगटातील १४ तर ७० ते ८० वयोगटातील ११ जणांचा समावेश आहे.५० ते ६० या वयोगटातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

- अतुल जयस्वाल

अकोला : जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाने सर्वच वयोगटातील लोकांना कवेत घेतले असले, तरी वयोवृद्धांसाठी हा संसर्गजन्य आजार जीवघेणा ठरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १४ दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एकूण ३४ रुग्णांपैकी २५ जण हे ६० ते ८० या वयोगटातील होते.एप्रिल महिन्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर अकोला शहर व जिल्ह्यात कोरोना चांगलाच फोफावला असून, दररोज शंभरपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५७३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, सद्यस्थितीत ११७३ पेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये सर्वच वयोगटातील लोकांचा समावेश आहे. कोरोनाने आतापर्यंत घेतलेल्या एकूण १८६ बळींपैकी ३४ बळी हे सप्टेंबर महिन्यातील आहेत. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १४ दिवसांतील कोरोनाबळींच्या संख्येचे विश्लेषण केले असता, यापैकी २५ जण हे ६० ते ८० या वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ६० ते ७० वयोगटातील १४ तर ७० ते ८० वयोगटातील ११ जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे तरुणांचाही मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत; परंतु हे प्रमाण नगन्य आहे. या कालावधीत ३० ते ४० या वयोगटातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० ते ५० या वयोगटातील केवळ एकाचा मृत्यू झाला आहे. ५० ते ६० या वयोगटातील ५ जणांचा मृत्यू सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १४ दिवसांमध्ये झाला आहे.नऊ पैकी सात महिला ५० पेक्षा अधिक वयाच्यासप्टेंबर महिन्यात १४ तारखेपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण ३४ जणांमध्ये नऊ महिलांचाही समावेश आहे. या महिला विविध वयोगटातील आहेत. यापैकी दोन महिला या ४० पेक्षा कमी वयाच्या , तर इतर सात महिला या ५० ते ७० या वयोगटातील असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.

आजार गंभीर झाल्यावर उपचारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंगावर दुखणे काढल्यामुळे आजार बळावतो. त्यानंतर अशा रुग्णांना वाचविणे कठीण होते. नागरिकांनी कुठलेही लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. जेणेकरून वेळेवर उपचार मिळून प्राण वाचू शकतात.

- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला