शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे आणखी सात बळी, ३३१ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७९१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ७९१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५५२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील २०, कौलखेड येथील १८, मोठी उमरी येथील ११, जलालाबाद व मलकापूर येथील प्रत्येकी १०, लहान उमरी, डाबकी रोड, शास्त्री नगर व तापडीयानगर येथील प्रत्येकी सात, जवाहर नगर, जीएमसी येथील प्रत्येकी पाच, बाळापूर, खडकी, गोरक्षण रोड व जूने शहर येथील प्रत्येकी चार, सुधीर कॉलनी, सिव्हील लाईन व गड्डम प्लॉट येथील प्रत्येकी तीन, पारस, शिव कॉलनी, मुर्तिजापूर, आकाशवाणी मागे, किर्ती नगर, रजपुतपुरा, गीता नगर, खदान, रतनलाल प्लॉट, खेडकर नगर, पातूर, राजंदा, कमला नगर, सिंधी कॅम्प, केशव नगर, शंकर नगर, रणपिसे नगर व महान येथील प्रत्येकी दोन, तर कान्हेरी गवळी, शिवाजी नगर, पलोदी, ग्रीन व्हॅली, वाडेगाव, आसापूर, मोरेश्वर कॉलनी, वृंदावन नगर, गोयका लेआऊट, गुलजारपुरा, पथ्रोडी, पिंपलनेर, माता नगर, राऊतवाडी, देवरावबाबा चाळ, रिधोरा, गायत्री नगर, रेणूका नगर, मालीपुरा, आझाद कॉलनी, भवानी पेठ, उज्जैन, भगीरथनगर, ज्योती नगर, बाळापूर नाका, रुपचंदा नगर, अकोली खुर्द, रेल्वे क्वॉर्टर, बाभूळगाव, वानखडे नगर, वाशिम बायपास, कळवेश्वर, अमानखॉ प्लॉट, आंबेडकर नगर, बलोदे लेआऊट, मेहकर, सातव चौक, कपिलवास्तू, शिरपूर, कृषी नगर, मराठा नगर, कलेक्टर हॉऊस, डिएचओ, राम नगर, राधाकृष्ण प्लॉट, शिवणी, मंगलवारा रोड, हिंगणा, शिवचरण पेठ, हिंगणा फाटा, वाघागड, वऱ्हाट बकाल, खोलेश्वर, व्दारका, गुल्लरघाट, वाडेगाव, लक्ष्मी नगर, राहेर, जठारपेठ, टाकळी, चांदुर, नयागाव, कंवर नगर, पिंपळखुटा, उजळेश्वर, तिवसा, सिसामासा, अंतुलेनगर, सिसा भांदखेड, टाकळी व अंजनी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

चार महिला, तीन पुरुष दगावले

कावसा ता.अकोट येथील ६२ वर्षीय महिला, राजंदा ता.बार्शीटाकळी येथील ५२ वर्षीय महिला, जुने नायगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, दोनद ता.बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष, प्रसाद कॉलनी येथील ७५ वर्षीय महिला, जगजीवनराम नगर येथील ७५ वर्षीय महिला व निबंधे प्लॉट येथील ८० वर्षीय पुरुष अशा सात जणांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी झाली.

२५७ जणांना डिस्चार्ज

युनिक हॉस्पिटल येथून चार, आयकॉन हॉस्पिटल येथून सात, ठाकरे हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक, कोविड केअर सेंटर बार्शी टाकळी येथून चार, हॉटेल स्कायलार्क येथून एक, खैरे उम्म हॉस्पिटल येथून पाच, सहारा हॉस्पिटल येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून तीन, आधार हॉस्पिटल मुर्तिजापूर येथून एक, हार्मोनी हॉस्पिटल येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून पाच, समाज कल्याण वसतिगृह येथून सात, आरकेटी कॉलेज येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, कोविड केअर सेंटर अकोट येथून दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २४ तर होम आयसोलेशन मधील १८२ अशा एकूण २५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४,०६८ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३२,१७१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २७,५६४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५३९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,०६८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.