शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Efect : व्हाटसअ‍ॅपवर दर्जेदार कादंबरीचा पुर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 18:32 IST

बुध्दिजीवी नागरिक व्हाटस्अ‍ॅपवर दर्जेदार मराठी , हिंदी कादंबरी वाचत आहेत.

- नीलिमा शिंगणे-जगडअकोला: कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी शासन शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. कामात व्यस्त राहणाऱ्या नागरिकांना घरी बसून कारायचे तरी काय, असा प्रश्न पडला. मात्र, स्वयं विलगीकरण करणाºया नागरिकांनी तर आपला छंद जोपासण्यासाठी ही उत्तम संधीच मिळाली आहे. कामाच्या व्यापात आपला छंद जोपासता येत नाही. त्यामुळे अशा कलाप्रेमी नागरिक वेळेचा सदुपयोग करीत आहेत. कोरोना संदर्भात अनेक फालतू विनोद, अफवा पसरविण्यात येत आहेत. परंतू बुध्दिजीवी नागरिक व्हाटस्अ‍ॅपवर दर्जेदार मराठी , हिंदी कादंबरी वाचत आहेत.रविवारी जनता संचारबंदी भारत सरकारने देशभरात लागू केली आहे. अशावेळी दिवसभर घरात बसून कादंबरी वाचन केल्यास काय हरकत आहे, असा विचार करू न व्हॉटसअ‍ॅपवर शनिवारी आलेल्या भरपुर अशा कादंबरी मराठी वाचक डाउनलोड करू न घेत आहेत. यामध्ये द.मा.मिरासदार, रत्नाकर मतकरी, वि.स.खांडेकर, सुधा मुर्ती, रणजित देसाई, शिवाजी सामंत, गुलजार आदी दिग्गज लेखकांच्या कादंबरी वाचायला मिळत आहेत. यामध्ये प्रामुख्याने चकाट्या, झोपाळा, घर हरविलेली माणसं, दोस्त, पाणपोई, मोसाद, तनमन, मध्यरात्र, धागे, स्वप्नातील चांदण, परीघ, पावनखिंड, बाई बायको कॅलेण्डर, स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी, अ‍ॅडम, फुकट, ययाति, मृत्युंजय या दर्जेदार कादंबरींचा समावेश आहे. कोरोना विषाणूला घाबरू न जावू नका, मात्र, काळजी घेतली तर निश्चितच या विषाणूचा नायनाट करणे सहज शक्य होणार आहे. यासाठी प्रत्येकाने घराबाहेर पडण्याचे टाळले पाहिजे. वाचनामुळे मेंदुला चालना मिळते. नवनवीन शब्दांमुळे बौध्दिक क्षमता वाढण्यासही मदत होते. नवनवीन माहिती तर मिळतेच शिवाय ज्ञानात भर पडते. आपल्या आवडीच्या विषयांची पुस्तके वाचून निश्चितच कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून आपण वाचू शकतो, ऐवढे मात्र निश्चित.

 

टॅग्स :Akolaअकोलाliteratureसाहित्यWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपcorona virusकोरोना वायरस बातम्या