शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases in Akola : रुग्णसंख्येत किंचीत घसरण; अकाेलेकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 10:37 IST

Corona Cases in Akola: शनिवारी काेराेनाबाधितांच्या संख्येत किंचित घसरण झाल्याचे समाेर आले आहे.

अकाेला : अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच शनिवारी काेराेनाबाधितांच्या संख्येत किंचित घसरण झाल्याचे समाेर आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार शहरातील १४५ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. काेराेना बाधितांचा घसरलेला आकडा पाहता अकाेलेकरांना दिलासा मिळाला आहे. यादरम्यान, अद्यापही पूर्व व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचा उद्रेक कायमच असल्याची परिस्थिती आहे. जिल्ह्यासह शहरात फेब्रुवारी महिन्यापासून काेराेनाने हाहाकार घातल्याचे चित्र आहे. मनपा क्षेत्रात काेराेनाचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे समाेर आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यापासून ते प्रभावी उपाययाेजना राबविण्यात प्रशासनाची यंत्रणा कुचकामी ठरली. दुसरीकडे नागरिकांनी साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम समाेर आले. मागील अडीच महिन्यांपासून शहरात दरराेज किमान अडीचशे ते तीनशे पेक्षा अधिक जणांना काेराेनाची बाधा हाेत असल्याचे अहवालाअंती समाेर आले. यामध्ये ज्यांनी काेराेनाची चाचणी केलीच नाही, अशा बाधितांची मनपाच्या दप्तरी नाेंदच नाही. त्यामुळे काेराेना बाधितांचा वाढता आकडा पाहता शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचा फैलाव झाल्याची परिस्थिती आहे. अशावेळी शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालात प्रथमच काेराेना बाधितांच्या संख्येत घसरण आल्याचे दिसून आले.

 

पूर्व व दक्षिण झाेन अनियंत्रित

शहरात दरराेज अडीचशे किंवा तीनशे रुग्ण आढळून येत असतील तर त्यामध्ये प्रत्येकी शंभर रुग्ण हे पूर्व व दक्षिण झाेनमधील आहेत. या दाेन्ही झाेनमधील रुग्णसंख्या कमी हाेण्याची काेणतीही चिन्हं दिसत नाहीत. शनिवारी प्राप्त अहवालात पूर्व झाेनमध्ये ५२ रुग्ण आढळून आले तसेच पश्चिम झाेनमध्ये २१, उत्तर झाेनमध्ये ११ व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचे ६१ रुग्ण आढळून आले आहेत.

 

१०५७ जणांनी दिले नमुने

काेराेनासदृश लक्षणे आढळून येणाऱ्या सुमारे १०५७ जणांनी मनपाच्या चाचणी केंद्रांमध्ये जाऊन नाकातील स्रावाचे नमुने दिले. यामध्ये ३३६ जणांनी आरटीपीसीआर आणि ७२१ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली. संबंधितांचे नमुने तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस