शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात कोरोना ब्लास्ट; एकाच दिवसात ४७३ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 20:24 IST

CoronaVirus News आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३९६, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ७७ अशा एकूण ४७३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, रविवार, २८ फेब्रुवारी रोजी आणखी एक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६७ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ३९६, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ७७ अशा एकूण ४७३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या १६,१४५ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १७७५ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३९६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १३७९ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कुरणखेड येथील ४४, चिंचखेड ता.मुर्तिजापूर येथील २२, मुर्तिजापूर येथील १५, डाबकी रोड येथील १२, एमआयडीसी व मोठी उमरी येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड येथील सात, कौलखेड येथील सहा, जठारपेठ, जीएमसी, सिंधी कॅम्प, माना, मलकापूर येथील प्रत्येकी पाच, आदर्श कॉलनी येथील चार, गायत्री नगर, रामदासपेठ, बार्शीटाकळी व केडीया प्लॉट येथील प्रत्येकी तीन, रामगाव, पातूर, शासकीय वसाहत, मार्डी ता.अकोट, केशव नगर,बायपास रोड, तापडीया नगर, गड्डम प्लॉट, पार्वती नगर, कृषी नगर, खडकी, जूने शहर, रवी नगर, म्हैसपूर, शंकर नगर, चैतन्य नगर, राऊतवाडी, जेतवन नगर व गिरी नगर येथील प्रत्येकी दोन, सहकार नगर, येळवन, संत नगर, गीता नगर, तेल्हारा, न्यु भागवत प्लॉट, तेलीपुरा चौक, मालेगाव बाजार, रतनलाल प्लॉट, गजानन पार्क, गांधी रोड, भाटवाडी, विठ्ठल नगर, गुरुदेव नगर, लहान उमरी, शरद नगर, अगासे नगर, व्हिएचबी कॉलनी, अकोट फैल, शिवसेना वसाहत, बाजोरीयानगर, पोलिस क्वॉर्टर, बोरगाव, चांदुर, कान्हायशिवणी, दगडी पूल, पवनपुत्र अर्पाटमेन्ट, हिंगणा नाका, नगर परिषद कॉलनी, जवाहर नगर, भारती प्लॉट, कैलास टेकडी, व्यकटेश नगर, सुधीर कॉलनी, खेतान नगर, खोलेश्वर, विजय नगर, जैन चौक, वानखडे नगर, खानापूर वेस, रुस्तमाबाद, रजपुतपुरा, गोडबोले प्लॉट, सत्यदेव नगर, टॉवर चौक, बाळापूर, राजीव गाधी नगर, उमरी, तोष्णीवाल लेआऊट, दुर्गा चौक, स्वराज्य पेठ, आपातापा रोड, बिर्ला कॉलनी, न्यु तापडीयानगर, रणपिसे नगर, आळसी प्लॉट, मराठा नगर, कलेक्टर ऑफीसजवह, महाजन प्लॉट व मुर्तिजापूर रोड येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये

पातूर येथील २८, कारला व जीएमसी येथील प्रत्येकी १०, रामदासपेठ, डाबकी रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी सहा, गोरक्षण रोड येथील पाच, हिवरखेड, तुकाराम चौक, जठारपेठ, माधवनगर, सातव चौक व मोठी उमरी येथील प्रत्येकी चार, राऊतवाडी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर, रतनलाल प्लॉट, लक्ष्मी नगर, कलेक्टर ऑफिसजवळ व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तुरखेड, तळेगाव बाजार, वर्धमान नगर, आळसी प्लॉट, आदर्श कॉलनी, राधाकिसन प्लॉट, शास्त्री नगर, खेतान नगर, चवरे प्लॉट, कृष्णी नगर, मलकापूर, रणपिसे नगर, मराठा नगर, भगीरथवाडी, आरोग्यनगर, गीता नगर, देशमुख हॉस्पीटल, माधव नगर, चक्रधर कॉलनी, अकोट, बाळापूर, बोरगाव, लहरिया नगर व चोहट्टा बाजार येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.

अकोट येथील महिला दगावली

कोरोनावर उपचार घेत असलेल्या अकोट येथील ६६ वर्षीय महिलेचा रविवारी मृत्यू झाला. त्यांना २३ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.

२३५ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ४७ जण, आयकॉन येथून पाच, आयुर्वेदिक हॉस्पीटल येथून १०, हॉटेल स्कायलार्क येथून सहा, हॉटेल रिजेंसी येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून सहा, अवघाते हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून चार, युनिक हॉस्पीटल येथून एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक, तर होम आयसोलेशनचा कालावधी संपलेले १५०, अशा एकूण २३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

 

३,४७६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १६,१४५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १२,३०२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३६७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ३,४७६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या