शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्व्हेटचे विद्यार्थी आरोग्य तपासणीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:49 IST

बाळापूर : इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानां तर्गत मोफत आरोग्य तपासणी केली जाते. मात्र, शहरातील झोपडपट्टी भागातील कॉन्व्हेटमधील गरीब विद्यार्थी आरोग्य तपासणीपासून कोसो दूर असल्याचे चित्र  आहे.

ठळक मुद्देबाळापूर शहरातील प्रकार विनाअनुदानित असल्याने केली नाही तपासणी

अनंत वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियानां तर्गत मोफत आरोग्य तपासणी केली जाते. मात्र, शहरातील झोपडपट्टी भागातील  कॉन्व्हेटमधील गरीब विद्यार्थी आरोग्य तपासणीपासून कोसो दूर असल्याचे चित्र  आहे.राष्ट्रीय ग्रामीण व शहरी आरोग्य अभियानांतर्गत शहर व ग्रामीण भागातील जि.प.  नगर परिषदेच्या व शासकीय अनुदानातील शाळांमधील विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा  मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. शहरासह तालुक्यातील एकूण १७४ शाळे तील ३0 हजार ७८५ विद्यार्थ्यांची तपासणी या सत्रात करण्यात आली. तसेच १  हजार ८६४ विद्यार्थी आरोग्य तपासणीला गैरहजर झाले. या तपासणीतून गेल्या पाच  वर्षांत २२ विद्यार्थ्यांना हृदयशस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले, तर १४ विद्यार्थ्यांच्या  पालकांनी हृदयशस्त्रक्रिया करण्यास नकार दिला आहे.शालेय आरोग्य तपासणी पथकात वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता व २ आरोग्य  कर्मचारी, असे एकूण चार जणांचे पथक आहे. दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या  विद्यार्थ्यांवर मोफत उपचार केला जातो. एका विद्यार्थ्यासाठी शासन दीड लाखांपर्यंत  मोफत खर्च करीत आहे. मात्र, तालुक्यातील थॅलेसिमियाग्रस्त विद्यार्थ्यांना या सेवेचा  लाभ मिळत नाही. नगर परिषदेच्या उर्दू, मराठीच्या १५ शाळेतील २ हजार १७७  विद्यार्थ्यांनी लाभ घेतला; परंतु ५0 हजार लोकसंख्येच्या शहरातील ९ नर्सरी  कॉन्व्हेंटमध्ये ५ हजारांच्यावर विद्यार्थी संख्या आहे. दारिद्रय़रेषेखालील  सर्वसाधारण व्यक्तीने शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊ झोपडपट्टीत राहून, आपला  उदरनिर्वाह करीत असला, तरी आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेमध्ये टाकले आहे.  अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांंना शिक्षण विभाग मात्र विनाअनुदानित असल्याचे कारण  पुढे करीत, आरोग्य तपासणी करत नसल्याचे चित्र आहे. 

गरजु विद्यार्थ्यांना मिळत नाही लाभ- लहानपणी तपासणी न झाल्यामुळे अनेक गरजू गरीब कुटुंबातील पालक आपल्या  पाल्याला महागडे आरोग्य उपचार देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी उ पचाराअभावी शिक्षणापासून वंचित राहत आहे. शहरानजीकच्या अनेक झोपडपट्टी  भागातील विद्यार्थी मोफत शिक्षण न घेता विनाअनुदानित कॉन्व्हेंटमध्येच शिक्षण घेत  आहेत. यास शिक्षण विभागा कारणीभूत आहे. 

- ग्रामीण व शहरी भागातील अनुदानित, विनाअनुदानित हा भेदभाव न करता  शिक्षण विभागाने शिक्षण घेणार्‍या सर्वच विद्यार्थ्यांंची आरोग्य तपासणी करावी,  अशी मागणी झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांंच्या पालकांनी केली आहे.   झोपडपट्टीभागा तील अनेक विद्यार्थी दुर्धर आजाराने ग्रासलेले आहेत. शिक्षण विभागाने आरोग्य  अभियान योजनेचा लाभ देण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. 

शिक्षण विभागाने विनाअनुदानित शाळेत आरोग्य तपासणी करण्याचा आदेश  दिल्यास सर्वच विद्यार्थ्यांंची शाळेतून तपासणी करू.  -डॉ. चेतन टिकार, वैद्यकीय अधिकारी, शहरी विभाग

टॅग्स :SchoolशाळाBalapurबाळापूर