शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले

By आशीष गावंडे | Updated: May 23, 2025 20:38 IST

अकोला येथे तिरंगा रॅलीच्या आढावा बैठकीत शिवसैनिकांनी गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

- आशिष गावंडे,अकोलाशिंदेंच्या शिवसेनेत दोन जिल्हाप्रमुखांच्या नियुक्तीचा वाद चव्हाट्यावर आला आहे. २३ मे रोजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले यांनी तिरंगा रॅलीसाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. शिंदेसेनेचे जिल्हा संपर्क नेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना पदावरून हटविण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. इथपर्यंत न थांबता शिवसैनिकांनी शहरातील प्रमुख चौकांमध्ये बाजोरीया यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे बॅनर जाळून घोषणाबाजी केली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

शिंदेसेनेचे जिल्हा संपर्क नेते, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी २० मे रोजी मुंबई येथे बाळापुर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात मोलाची भूमिका बजावली. यामध्ये जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर तसेच अश्विन नवले यांच्याकडील विधानसभा मतदारसंघ कमी करण्यात आल्याने त्याचे पडसाद आजच्या आढावा बैठकीत दिसून आले. 

तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारणी तसेच शहर कार्यकारणीतील असंख्य पुरुष व महिला शिवसैनिकांनी ‘‘बाजोरिया हटाव, पक्ष बचाव’’ अशी नारेबाजी केली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. 

स्थानिक नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करुन गैरसमज पसरविल्या जात असल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच पक्षातील माजी नगरसेवकांविरोधात अॅट्रॉसिटी दाखल करण्यातही नेत्यांनी प्रमुख भूमिका बजावल्याचे शशी चोपडे यांनी सांगितले. 

यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले, जिल्हा समन्वयक गजाननराव पावसाळे, बादलसिंह ठाकुर, महानगरप्रमुख योगेश अग्रवाल, शहर प्रमुख रमेश गायकवाड, पप्पू मोरवाल यासह अनेक प्रमुख पदाधिकारी,माजी नगरसेवक उपस्थित होते.

पुतळा जाळून व्यक्त केला निषेध

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भवनमधील बैठक आटोपताच काही शिवसैनिकांनी शहरातील धिंग्रा चौक, नेहरु पार्क चौकासह इतर काही ठिकाणी शिंदेसेनेचे संपर्क नेते गोपीकिशन बाजोरिया यांचे प्रतिकात्मक बॅनर जाळले. त्यावेळी बाजोरिया यांच्याविरोधात नारेबाजी करण्यात आली.

भाजपमधील पदाधिकाऱ्यांना खिरापत

मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत खस्ता खाल्लेल्या निष्ठावान शिवसैनिकांना उपेक्षित ठेवल्या जात असल्याची भावना बैठकीत पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. शिवभोजन केंद्राचा लाभ मर्जितील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. भाजपमधून आलेल्यांना पदांची खिरापत वाटली जात असल्याचा मुद्दा बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मांडला.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेGopikishan Bajoriaगोपीकिशन बाजोरीयाPoliticsराजकारण