शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील १९,२८० बालकांना पाजली दूषित पोलिओ लस

By atul.jaiswal | Updated: October 2, 2018 13:21 IST

अकोला: गाझियाबाद येथील कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीत टाइप-२ व्हायरस आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असतानाच, ही दूषित लस आरोग्य सेवा, अकोला मंडळातील यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील १९,२८० बालकांना पाजण्यात आल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.

ठळक मुद्देबायोमेड प्रा. लि. या कंपनीने तयार केलेल्या लसीचे १ लाख ४७ हजार डोज प्राप्त झाले होते. वाशिम जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांमधून बालकांना ७,७०० डोज पाजण्यात आले. तर यवतमाळ जिल्ह्यात ११ हजार ५८० डोज बालकांना पाजण्यात आले.

- अतुल जयस्वाल अकोला: गाझियाबाद येथील कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीत टाइप-२ व्हायरस आढळल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असतानाच, ही दूषित लस आरोग्य सेवा, अकोला मंडळातील यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील १९,२८० बालकांना पाजण्यात आल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.पोलिओ निर्मूलन करण्यासाठी शून्य ते ५ वयोगटातील बालकांना इंजेक्शन व तोंडावाटे अशा दोन प्रकारे लसीकरण केले जाते. खासगी कंपन्यांकडून शासनाला लसीचा पुरवठा केला जातो. गाझियाबाद येथील बायोमेड प्रा. लि. या कंपनीने तयार केलेल्या पोलिओ लसीत टाइप-२ हा पोलिओ व्हायरस आढळून आल्यानंतर केंद्र शासनाने १० सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात ११ सप्टेंबरपासून या लसींचा वापर पूर्णपणे थांबविण्यात आला. अकोला आरोग्य सेवा मंडळाला १८ आॅगस्ट रोजी गाझियाबाद येथील बायोमेड प्रा. लि. या कंपनीने तयार केलेल्या लसीचे १ लाख ४७ हजार डोज प्राप्त झाले होते. यापैकी अकोला येथील मुख्यालयातून यवतमाळ जिल्ह्याला १५ हजार डोज, तर वाशिम जिल्ह्यासाठी २१ हजार ५०० डोज पाठविण्यात आले. लसींचा वापर थांबविण्याचा आदेश येण्यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांमधून बालकांना ७,७०० डोज पाजण्यात आले, तर यवतमाळ जिल्ह्यात ११ हजार ५८० डोज बालकांना पाजण्यात आले. वापर थांबविण्याचा आदेश आल्यानंतर वाशिम जिल्ह्यात १३ हजार ८०० डोज, तर यवतमाळ जिल्ह्यात ३ हजार ४२० डोज सिल करण्यात आले. दोन्ही जिल्हे मिळून १९ हजार २८० डोज पाजण्यात आले. एकून १७ हजार २२० डोज सिल करण्यात आले आहेत.अकोला, बुलडाणा, अमरावतीमध्ये दुसऱ्या कंपनीची लसया काळात आरोग्य सेवा मंडळातील अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांसाठी लसींचा पुरवठा करण्यात आला; परंतु या लस दुसºया कंपनीच्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात गाझियाबाद येथील कंपनीच्या लसीचे डोस वितरित करण्यात आले. ही लस बालकांना पाजण्यात आली असली, तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण यामध्ये क्षीण व्हायरस असतात. त्यापासून काहीही अपाय उद्भवत नाही.

- डॉ. आर. एस. फारुखी, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यYavatmalयवतमाळwashimवाशिम