शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

एचडीएफसी बँकेला ग्राहक मंचाचा दणका; गहाणातील मालमत्ता मुक्त करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 14:11 IST

अकोला: एचडीएफसी बँकेकडे मालमत्ता गहाण देऊन त्या मोबदल्यात अशोकराव पोहरे व राहुल पोहरे यांनी घेतलेले कर्ज पूर्णत: परतफेड केल्यानंतरही सदर गहाण असलेली मालमत्ता मुक्त करून न देता त्यांच्याकडून आणखी रक्कम हडप करणाऱ्या एचडीएफसी बँकेला ग्राहक मंचाने दणका दिला आहे.

अकोला: एचडीएफसी बँकेकडे मालमत्ता गहाण देऊन त्या मोबदल्यात अशोकराव पोहरे व राहुल पोहरे यांनी घेतलेले कर्ज पूर्णत: परतफेड केल्यानंतरही सदर गहाण असलेली मालमत्ता मुक्त करून न देता त्यांच्याकडून आणखी रक्कम हडप करणाऱ्या एचडीएफसी बँकेलाग्राहक मंचाने दणका दिला आहे. अशोकराव पोहरे यांची गहाण मालमत्ता तातडीने मुक्त करून त्यांना नुकसान भरपाईही देण्याचा आदेश देण्यात आला आहे.जठारपेठेतील रहिवासी अशोकराव पोहरे व राहुल पोहरे यांनी त्यांची मालमत्ता गहाण देऊन एचडीएफसी बँकेच्या अकोला शाखेतून कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज परतफेडीसाठी १२० हप्त्यांची मुदत त्यांना देण्यात आली होती. त्यानुसार पोहरे यांनी सदरचे कर्ज नियमित परतफेड करून १२० हप्त्यात रक्कम भरली होती; मात्र त्यानंतर बँकेने पोहरे यांची त्यांच्याकडे गहाण असलेली मालमत्ता गहाणमधून मुक्त करून देण्यास टाळाटाळ करीत आणखी ३९ हप्त्यात परतफेड करीत पैसे भरण्यास सांगितले. यामधील काही रक्कम भरल्यानंतरही बँकेने त्यांची मालमत्ता मुक्त करून न देता उलट सदरची मालमत्ता जाहीर लिलावामध्ये विक्री करण्याची धमकी पोहरेंना दिली. त्यामुळे अशोकराव पोहरे आणि राहुल पोहरे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्रात धाव घेतली. एचडीएफसीच्या मुंबई व अकोला कार्यालयाविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत प्रकरण दाखल केले. ग्राहक तक्रार निवारण मंचने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पोहरे यांनी १२० हप्त्यात रक्कम भरली असून, यापेक्षा अधिक रक्कम वसुली करण्याचे अधिकार बँकेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच बँकेने पोहरे यांची गहाण मालमत्ता तातडीने मुक्त करण्याचा आदेश देऊन नुकसान भरपाईपोटी ८ हजार रुपयांची रक्कम देण्याचा आदेश दिला. या प्रकरणी अशोकराव पोहरे यांच्यावतीने अ‍ॅड. मो. परवेज दोकाडिया व अ‍ॅड. परेश सोलंकी यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :Akolaअकोलाconsumerग्राहकbankबँक