शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाचे बांधकाम जूनच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 13:06 IST

शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गही अंतर्भूत करण्यात आला आहे. ३७१ कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चातून शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार असून, आगामी पालखी येण्याच्या म्हणजे जूनच्या आत हा मार्ग तयार होणार आहे.

- संजय खांडेकरअकोला : मागील पालखी मार्गावर झालेला भीषण अपघात लक्षात घेत, महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरातील पालखी मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यात शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गही अंतर्भूत करण्यात आला आहे. ३७१ कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चातून शेगाव-पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्गाच्या बांधकामाला सुरुवात होणार असून, आगामी पालखी येण्याच्या म्हणजे जूनच्या आत हा मार्ग तयार होणार आहे. अकोला जिल्ह्यातील ५२ आणि वाशिम-बुलडाणा जिल्ह्यातील ३० असा एकूण ८२ किलोमीटर स्वतंत्र मार्गांवर अनेक सुसज्ज सेवा प्रदान करण्याचा संकल्प आहे.राज्यात वारकरी सांप्रदायिकांची अनेक श्रद्धास्थाने असून, दरवर्षी वैष्णवांचा मेळा पंढरपुरात भरतो. राज्यभरातील कानाकोपऱ्यांतून पालख्या पंढरपुरात पोहोचतात. पालखी वाहणाºया भाविकांच्या सुरक्षा आणि सुविधेसाठी राज्याने महत्त्वाचे पाऊल उचलून स्वतंत्र मार्गांची निर्मिती सुरू केली आहे. महाराष्ट्रातील सर्व पालखी मार्ग जोडण्याच्या या प्रकल्पांवर हजारो कोटींचा खर्च होत आहे. अशाच पालखी मार्गांमध्ये शेगाव-पंढरपूर मार्ग आहे. स्वतंत्र असलेल्या या पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्वच्छतागृहे, झेब्रा क्रॉसिंग, वृक्षारोपण, थांब्यासाठी टिनशेड, पार्किंग, लोखंडी कठडे अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. या मार्गाचे उद्घाटन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ५ फेब्रुवारी रोजी होणार असून, या प्रस्तावित ३७१ कोटींच्या निधीचा १८ कोटींचा पहिला टप्पा अकोला बांधकाम मंडळाकडे पोहोचला आहे. शेगाव-नागझरी-मेडशी-डव्हा-मालेगाव-बीबी-किनगाव जट्टू आणि पारस-निमकर्दा-गायगाव-भौरद-डाबकीपर्यंतचा मार्ग काढला जाणार आहे. यापैकी सर्वात जास्त मार्गाची लांबी अकोला जिल्ह्यातील मार्गाची आहे. वाशिम-बुलडाणा जिल्ह्यातील मार्गांचे अंतर त्या तुलनेत कमी आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया शेगावला पायदळ जाणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पायदळ वारी करणाºया भाविकांसाठी स्वतंत्र पालखी मार्ग सोयीचा होणार आहे. 

जून महिन्यात पालखी येण्यापूर्वी हायब्रिड अ‍ॅन्युईटी अंतर्गत स्वतंत्र पालखी मार्ग कोणत्याही परिस्थितीत तयार करण्याचे निर्देश आहेत. यासाठी १८ कोटींचा निधी आला आहे.-जी. व्ही. जोशी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभागShegaonशेगावPandharpurपंढरपूर