शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

बांधकाम साहित्य उठले अकोलेकरांच्या जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 12:45 IST

अकोला: इमारतींचे बांधकाम करताना चक्क रस्त्यावर तसेच सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य टाकून अकोलेकरांच्या जीवावर उठणाºया मालमत्ताधारकांची महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी पाठराखण करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अकोला: इमारतींचे बांधकाम करताना चक्क रस्त्यावर तसेच सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य टाकून अकोलेकरांच्या जीवावर उठणाºया मालमत्ताधारकांची महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी पाठराखण करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी रस्त्यावरील बांधकाम साहित्य न हटविल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश जारी केला होता. या आदेशाला झोन अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असली तरी यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत असल्याची परिस्थिती आहे.शहराच्या कानाकोपºयात विविध इमारतींचे बांधकाम जोरात सुरू आहे. बांधकाम करताना संबंधित मालमत्ताधारकांकडून विटा, रेती, गिट्टी, लोखंड तसेच इतर साहित्य ठेवण्यासाठी चक्क रस्ते किंवा सार्वजनिक जागेचा वापर केला जात आहे. नगररचना विभागाच्या नियमानुसार बांधकाम साहित्य उघड्यावर ठेवता येत नाही. मालमत्ताधारकाने खासगी मालमत्तेवर आवारभिंत उभारून त्यामध्ये साहित्य ठेवणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या नियमांची ऐशीतैशी करीत बांधकाम करणाºयांनी चक्क रस्त्यांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे संबंधित परिसरातून वाहतूक करणाºया वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या रेती, गिट्टीमुळे वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. संबंधित मालमत्ताधारकाला हटकल्यास किंवा सूचना केल्यास त्यांच्याकडून अरेरावीची भाषा केली जाते. याप्रकरणी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे पाहून रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. हा प्रकार लक्षात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणाºया मालमत्ताधारकांना दंड बजावण्याचा निर्णय घेत तसे निर्देश जारी केले होते. या निर्देशांकडे क्षेत्रीय अधिकारी, नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग व आरोग्य निरीक्षकांनी सपशेल पाठ फिरवली आहे.महापालिका सुस्त; अकोलेकरांचा जीव धोक्यातरस्त्यावरील बांधकाम साहित्य न हटविल्यास ते जप्त करण्यासोबतच दंड बजावण्याची कारवाई मनपाच्या नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग, आरोग्य-स्वच्छता विभाग व झोन अधिकाºयांनी संयुक्तरीत्या करणे अपेक्षित आहे. मनपाच्या तीनही विभागाकडून या विषयाकडे दुर्लक्ष होत असेल तर मनपाचा कारभार किती सक्षमपणे सुरू आहे, याचा अकोलेकरांना अनुभव येत आहे.इशारा तुडवला पायदळीकमर्शियल कॉम्प्लेक्स असो वा रहिवासी इमारती किंवा घरांचे बांधकाम साहित्य रस्त्यावर असेल तर तीन दिवसांत ते तातडीने हटविण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने दिले होते. साहित्य न हटविल्यास ते जप्त करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. रस्त्यांवर बांधकाम साहित्याचे ढीग पाहता मालमत्ताधारकांनी मनपाचा इशारा पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका