शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेतील पराभवाचे काँग्रेस करणार मंथन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 12:39 IST

निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करून त्यावर तोडगा काढण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी केली आहे.

अकोला: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ मधील निवडणुकीत पक्षाचे उमेदवार हिदायत पटेल यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. यंदा त्यामध्ये घसरण होऊन तिसºया क्रमांकाची मते मिळाली. पक्षाचा पराभव आणि संघटना बांधणीवर चर्चा करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी क ाँग्रेसचे शहर अध्यक्ष बबनराव चौधरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सतराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. दुसरीकडे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होणार असल्याने निवडणुकीत रंगत आली होती. दोन्ही उमेदवार भाजपच्या संजय धोत्रे यांच्यासह एक मेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे असले तरी दुसºया क्रमांकाची मते कोणाला मिळतात, यावर काँग्रेस आणि वंचित आघाडीत रस्सीखेच सुरू होती. २०१४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत काँगे्रसचे हिदायत पटेल यांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती. त्यावेळी अ‍ॅड. आंबेडकर तिसºया क्रमांकावर होते. यंदा अ‍ॅड. आंबेडकर यांना दुसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसची पीछेहाट होऊन तिसºया क्रमांकाची मते मिळाली. ही बाब लक्षात घेता निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करून त्यावर तोडगा काढण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड, विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी पत्राद्वारे क ाँग्रेसचे शहर अध्यक्ष बबनराव चौधरी यांच्याकडे केली आहे. या पत्राची दखल घेऊन बबनराव चौधरी बैठकीचे कधी आयोजन करतात, याकडे लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या मतांमध्ये घसरणलोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर भाजप उमेदवार संजय धोत्रे यांना ५ लाख ५४ हजार ४४४ मते मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर वंंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली, तर काँग्रेसचे हिदायत पटेल यांना तिसºया क्रमांकाची २ लाख ५४ हजार ३७० मते मिळाली. काँग्रेसच्या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय मिळालेल्या मतांचा आढावा घेतल्या जाणार असल्याची माहिती आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवावर कारणमीमांसा करण्यासाठी गत आठवड्यात प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. त्या बैठकीला स्थानिक सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्याच विषयावर बैठक घेण्यासंदर्भात पत्र प्राप्त झाले असून, लवकरच बैठकीचे आयोजन केले जाईल.-बबनराव चौधरी, शहर अध्यक्ष काँग्रेस.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसBabanrao Chaudharyबबनराव चौधरी