शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

काँग्रेस हायकमांड ऐकते तरी कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:44 IST

भाजपाच्या लाटेने पूर्णपणे वाहून गेलेल्या काँगे्रसला उभारी देण्यासाठी बाहेरून नेतृत्व येणार नाही. येथीलच नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल, विश्वास टाकावा लागेल.

- राजेश शेगोकारअकोला: दोन वर्षांपूर्वी अकोला महानगर काँग्रेस अध्यक्ष पदावर बबनराव चौधरी यांची नियुक्ती झाल्यानंतर येथील तरुण पदाधिकाऱ्यांनी एल्गार पुकारत या नियुक्तीला विरोध करून चक्क आत्मक्लेष आंदोलनही केले होते; मात्र काँग्रेसच्या हायकमांडने त्यांच्या निर्णयात कोणताही बदल केला नाही. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी उमेदवार निश्चित करताना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांच्याऐवजी शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी देण्याची मागणीही बेदखल करण्यात आली तर अकोल्यातून मुस्लीम उमेदवार देऊ नये, या कार्यकर्त्यांच्या मागणीलाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. २०१४ च्या मोदी लोटेने गलितगात्र झालेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेतून मनोबल देत कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचाच विचार केला गेला नाही. त्यामुळे २०१९ च्या दारुण पराभवानंतर काँग्रेस हायकमांड ऐकते तरी कोणाचे, असा प्रश्न अनेक पदाधिकाºयांच्या चर्चेतून समोर आला आहे.अकोल्यात गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसला स्वबळावर लोकसभा मतदारसंघ जिंकता आलेला नाही. भाजपाने लागोपाठ विजय मिळवित अकोल्याच्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आव्हानच मोडून काढले आहे. या पृष्ठभूमीवर पक्षाची विचारधारा जिवंत ठेवत काम करणाºया निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी ‘बदल’ होईल, या आशावादावर काम करीत होती. २०१९ मध्ये नव्या दमाचा उमेदवार देऊन काँगे्रस पक्ष कार्यकर्त्यांना चैतन्य देईल, ही अपेक्षा फोल ठरली अन् त्याच ठिकाणी काँग्रेसच्या पराभवाचा पाया रचला गेला. पटेल यांचे नाव जाहीर होताच, काँग्रेसच्या गोटातून सर्वांनीच काँग्रेसश्रेष्ठींच्या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. खासदार संजय धोत्रे यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्याची ताकदच काँग्रेसची नव्हती. डॉ. अभय पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्या उमेदवारीचे वारे मतदारसंघात फिरविले अन् ऐनवळी तांत्रिक कारणांनी घात झाल्याने पटेल यांच्या रूपाने मुस्लीम समाजाला खूश करण्याचा प्रयोग काँग्रेसने पुन्हा एकदा केला; मात्र हा प्रयोग काँग्रेसच्या विजयासाठी कमी अन् अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची कोंडी करण्यासाठी अधिक होता, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसनेच ‘काँग्रेस’चा ‘गेम’ केला आहे.खरे तर काँग्रेसचे संघटन केवळ कागदावरच उरले आहे. संघटनेत बदल नाही, नव्या चेहºयांना स्थान नाही, अजूनही सत्तेत आहोत अशा स्वरूपाच्या वागण्यात बदल नाही, दुसºया फळीची निर्मितीची नाही, अशी अनेक नकारात्मक कारणांची मोठी यादी सांगता येईल. मोदी लाट हे काँग्रेसच्या परिणामांचे एकमेव कारण नाहीच, भाकरी न फिरविणे हेही सर्वात मोठे कारण आहे. मोदी लाटेतही दुसरा क्रमांक टिकविणारी काँग्र्रेस आज तिसºया क्रमांकावर फेकली गेली आहे. याउलट मुस्लीम मतांमध्ये मोठे धु्रवीकरण न करताही अ‍ॅड. आंबेडकरांची ‘वंचित’ आघाडी दुसºया क्रमांकावर गेली. याचे कारण त्यांनी बदल केला. भारिप-बमसं पक्ष विलीन करण्याचीही हिंमत दाखविली. दुसरीकडे सर्वकाही संपले असतानाही काँग्रेस बदल स्वीकारायला तयार नाही. यामध्येही पराभवाचे कारण दडलेले आहे. भाजपाच्या लाटेने पूर्णपणे वाहून गेलेल्या काँगे्रसला उभारी देण्यासाठी बाहेरून नेतृत्व येणार नाही. येथीलच नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल, विश्वास टाकावा लागेल. एकाच निवडणुकीत बदल होईल, अशी अपेक्षा न ठेवता नव्या दमाची संघटना बांधावी लागेल. त्याची सुरुवात येत्या विधानसभा निवडणुकीत करावी लागेल. त्यासाठी ‘भाकरी’ फिरविणे हाच उपाय आहे, अन्यथा आज भाकरी करपली आहे म्हणून २२ टक्के मतदार तरी सोबत आहेत. उद्या भाकरी पूर्णपणे जळून गेल्यावर काँग्रेसचा पंजा उंचावयालासुद्धा ‘हात’ राहणार नाही!

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल