शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

युतीबाबत काँग्रेसकडून प्रतिसाद नाही - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 12:15 IST

अकोला : काँग्रेससोबत युती करण्यासाठी आमची तयारी आहे; परंतु काँग्रेसकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नसल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्दे सोबत ‘एमआयएम’ असल्याने राज्यात बदल अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारिप बहुजन महासंघाने युती करताच मात्र जे सेक्युलर नाहीत, त्यांना पोटशूळ उठले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

- राजरत्न सिरसाटअकोला : काँग्रेससोबत युती करण्यासाठी आमची तयारी आहे; परंतु काँग्रेसकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नसल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खास ‘लोकमत’शी बोलताना दिली.केंद्र, राज्यातील सरकारला जनता कंटाळली असून, जनतेलाच बदल हवा आहे. त्यादृष्टीने आम्ही जनतेसमोर पर्याय ठेवला आहे. वंचित बहुजन समाजाला सोबत घेऊन आम्ही राज्यात येत्या विधानसभेत चांगली कामगिरी करू न दाखवू. सोबत ‘एमआयएम’ असल्याने राज्यात बदल अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार यांनी राफेल विमान खरेदीबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत राहुल गांधी यांच्या बचावासाठी राज्यातील एकाही काँग्रेस नेत्याने बोलू नये, याचा अर्थ कार्यकर्ते काँग्रेसच्या बाजूने नाहीत, असा घ्यावा का, असा प्रश्नही अ‍ॅड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. मल्लिकार्जुन खडगे यांनी याबाबत व्यक्तिगत मत मांडले; पण वरिष्ठ नेते याबाबत अधिकृतपणे खंडन करायला तयार नाहीत, म्हणजे शरद पवारांनी उघड भूमिका घेऊनही राष्टÑवादी काँग्रेससोबत काँग्रेस युती करीत असेल, तर आता लोकांनीच यामागील निष्कर्ष काढावा, असे आवाहन त्यांनी केले.भारिप बहुजन महासंघाने ‘एमआयएम’सोबत युती केल्यानंतर अनेकांनी टीका केली, याबाबत त्यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. निवडणूक आयोगाने एमआयएम पक्षाची नोंदणी करू न मान्यता दिली, तेव्हा एमआयएम हा पक्ष सेक्युलर आहे, हे आपण मान्य केले पाहिजे. भारिप बहुजन महासंघाने युती करताच मात्र जे सेक्युलर नाहीत, त्यांना पोटशूळ उठले, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. कोरेगाव-भीमा प्रकरणात आम्ही आमचे म्हणणे आयुक्तांपुढे मांडले आहे. खरेतर या प्रकरणात लोकांंची साक्ष घेण्याअगोदर ज्या संघटना जबाबदार आहेत, त्यांची व सरकारी अधिकाऱ्यांची सुनावणी घेणे गरजेचे आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

 तो पवारांचा अहंकारशरद पवार यांनीच तुम्हाला निवडून आणल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यासंदर्भात आंबेडकर यांनी पवार यांचा तो अहंकार असल्याचे सांगितले. माणसात एवढाही अहंकार नसावा, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघcongressकाँग्रेसPoliticsराजकारण