शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

ग्रामपंचायतींमधील कोट्यवधी रुपये अपहाराच्या वसुलीचा संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 1:10 PM

लेखा परीक्षणात उघड झालेल्या ग्रामपंचायतींमधील तीन कोटींपेक्षाही अधिक अपहारित रक्कम वसुलीचे काय सुरू आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या दौºयात गैरव्यवहार, अनियमिततेच्या अनेक प्रकरणात कोट्यवधी रुपये दंडासह वसूल करण्याचे समितीने प्रस्तावित केले होते. त्याचवेळी लेखा परीक्षणात उघड झालेल्या ग्रामपंचायतींमधील तीन कोटींपेक्षाही अधिक अपहारित रक्कम वसुलीचे काय सुरू आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.पंचायत राज समितीने जून २०१७ मध्ये अकोला जिल्हा परिषदेचा दौरा करत कारभाराचा धांडोळा घेतला होता. त्यावेळी समितीने २००८-०९ आणि २०११-१२ या वर्षातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींच्या लेखापरीक्षण अहवालातील लेख्यांचे पुनर्विलोकन केले. संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी झालेल्या चर्चेत विविध प्रकरणात निधीचा अपहार, गैरव्यवहाराची उदाहरणे पुढे आली. काहींनी लेखापरीक्षणासाठी कागदपत्रेच उपलब्ध केली नाहीत. त्यामुळे त्यांच्या खर्चाचा हिशेबही जुळला नाही. त्या प्रकरणात संबंधितांवर प्रशासकीय कारवाईसह दंडात्मक वसुली करण्याचे निर्देश पंचायतराज समितीने दिले. त्याचवेळी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये विविध विकास योजनांच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे लेखा परिक्षण अहवालातून पुढे आले होते. ती अपहारित रक्कम वसुलीची कारवाई सुरू असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने समितीपुढे सांगितले होते; मात्र त्यानंतर त्या वसुलीच्या कारवाईचे काय सुरू आहे, ही बाब गुलदस्त्यात आहे. पंचायत विभागाकडून रक्कम वसुलीसाठी कोणती कारवाई सुरू आहे, याची माहितीही पुढे आलेली नाही.

 विविध योजनांमध्ये २.७८ कोटींचा अपहारजिल्हा परिषदेच्या २०१०-११ च्या लेखा परीक्षण अहवालात ग्रामपंचायतीमध्ये ४७६ प्रकरणात २ कोटी ७८ लाख ५६ हजार ६५७ रुपये वसूलपात्र ठरलेली आहे. त्यामध्ये ग्रामनिधी, जवाहर रोजगार योजना, जवाहर ग्रामविकास योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेतील कामांचा समावेश आहे. त्यापैकी ३० अपहाराच्या प्रकरणातील १७ लाख १८,५५२ रुपये वसूल करण्यात आले, तर ४४६ प्रकरणातील २ कोटी ६१ लाख ३८,११५ रुपये वसुलीचे काय झाले, याची माहिती पंचायत विभागाकडून मिळू शकली नाही.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद