लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल गत महिन्यात शासनाकडे सादर करण्यात आला असताना, २३ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयातील अटीनुसार, पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त कपाशीचे नुकसान झालेल्या महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकर्यांनाच आता कपाशीची मदत मिळणार आहे.बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून, कपाशी पीक नुकसानाचा अहवाल गत ४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्हय़ातील अकोला, अकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत १ लाख ३४ हजार ३२0 शेतकर्यांचे १ लाख ४४ हजार ४७८ हेक्टर ९९ आर क्षेत्रावरील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्यांच्या मदतीसाठी १३५ कोटी ९१ लाख ९0 हजार १५0 रुपये निधीची मागणीही अहवालात करण्यात आली. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्यांना मदत देण्यासंदर्भात शासनाच्या २३ फेब्रुवारी रोजीच्या निर्णयानुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रती हेक्टर ६ हजार ८00 रुपये आणि बागायत क्षेत्रासाठी प्रती हेक्टर १३ हजार ५00 रुपये दोन हेक्टर र्मयादेपर्यंत मदत देण्यात येणार आहे; परंतु बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकर्यांना मदतीचे वाटप करताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत कापूस पिकाच्या पीक कापणी प्रयोगानुसार ज्या शेतकर्यांचे कापूस पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाने, अशाच महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकर्यांना कपाशी देण्यात येणार आहे. पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याचे आढळून आलेल्या महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकर्यांना मदत देण्यात येणार नाही, अशी अट शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे कपाशी पिकाच्या नुकसान भरपाईपोटी मदतीसाठी बोंडअळीग्रस्त शेतकर्यांना आता पीक कापणी प्रयोगानुसार नुकसानाची अट पूर्ण करावी लागणार आहे.
कपाशीच्या मदतीसाठी आता ‘पीक कापणी प्रयोगा’ची अट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 01:26 IST
अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल गत महिन्यात शासनाकडे सादर करण्यात आला असताना, २३ फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयातील अटीनुसार, पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त कपाशीचे नुकसान झालेल्या महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकर्यांनाच आता कपाशीची मदत मिळणार आहे.
कपाशीच्या मदतीसाठी आता ‘पीक कापणी प्रयोगा’ची अट!
ठळक मुद्देबोंडअळीचा प्रादुर्भाव ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानाला मदत